Cabinet Meeting : आता वडिलांच्या नावाआधी लागणार आईचे नाव; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Cabinet Meeting : आता वडिलांच्या नावाआधी लागणार आईचे नाव; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

0
EVM

Cabinet Meeting : नगर : सर्व शासकीय (Government) कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक (Compulsory) करण्यात आले आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण (State Women and Child Welfare) विभागातर्फे तसा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने (Cabinet Meeting) मंजुरी दिली आहे.

हे देखील वाचा : नीलेश लंके म्हणाले, अजून काही ठरलं नाही

नावनोंदणीत आईचे नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी नावनोंदणीत आईचे नाव समाविष्ट करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, १ मे २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव, आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपातच करणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशीच नोंद सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्येही करावी लागणार आहे.

नक्की वाचा : लाेकसभा निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून ईडीकडून जाणून बुजून कारवाई; शरद पवार यांची टीका

सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय (Cabinet Meeting)

सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म-मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या सुधारणा करून नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाशी विचारविनिमय करावा, असे आदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here