Cabinet Meeting:देशातील गरिबांना पुढील चार वर्षे मोफत धान्य मिळणार,मोदी सरकारचा निर्णय

0
Cabinet Meeting:देशातील गरिबांना पुढील चार वर्षे मोफत धान्य मिळणार,मोदी सरकारचा निर्णय
Cabinet Meeting:देशातील गरिबांना पुढील चार वर्षे मोफत धान्य मिळणार,मोदी सरकारचा निर्णय

Cabinet Meeting: देशातील गरीब जनतेला पुढील चार वर्षे मोफत धान्य (Free cereal) मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखाली आज (ता.९) पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोफत धान्य वितरणाची मुदत चार वर्षांसाठी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. या बैठकीत इतर अनेक योजनांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini Vaishnaw) यांनी मंत्रिमंडळातील निर्णयांची माहिती दिली.

नक्की वाचा : १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये सामावून घेणार-भरत गोगावले 

गरिबांना मोफत तांदळाचा पुरवठा (Cabinet Meeting)

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, मंत्रिमंडळाने जुलै २०२४ ते डिसेंबर २०२८ पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत मोफत तांदळाचा पुरवठा सुरू ठेवण्यास मंजुरी दिलीय.सरकारच्या या उपक्रमाचा उद्देश विकासाला चालना देणे आणि पोषण सुरक्षा वाढवणे हा आहे. गरिबांना मोफत तांदळाचा पुरवठा केल्यास अशक्तपणा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दूर होईल.

मोदी सरकारचा ॲनिमिया मुक्त भारत मोहिमेबाबत मोठा निर्णय (Cabinet Meeting)

सर्वसामान्यांचे आरोग्य लक्षात घेऊन मोदी सरकारने पोषण सुरक्षा आणि ॲनिमिया मुक्त भारत मोहिमेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेवर १७,०८२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. अशक्तपणा दूर करण्यासाठी पुरवठा साखळीचे जाळे मजबूत करण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे.

अवश्य वाचा : राज्यात आजपासून पुन्हा पावसाची शक्यता,हवामान विभागाचा अंदाज
मंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले की, देशातील गरजूंपर्यंत तांदूळ पोहोचवण्यासाठी पुरवठा साखळी विकसित केली जाईल. २१ हजार तांदूळ कारखान्यांनी २२३ एलएमटी फोर्टिफाइड राईसची मासिक क्षमता असलेले ब्लेंडर बसवले आहेत. फोर्टिफाइड तांदळाची गुणवत्ता तपासण्यासाठी ५२ लॅब तयार करण्यात आल्या आहेत. पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी ११,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here