Case Filed : कोठला परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; २० जणांवर गुन्हा दाखल

Case Filed : कोठला परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; २० जणांवर गुन्हा दाखल

0
Case Filed : कोठला परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; २० जणांवर गुन्हा दाखल
Case Filed : कोठला परिसरात जुगार अड्ड्यावर छापा; २० जणांवर गुन्हा दाखल

Case Filed : नगर : अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे (Dr. Dilip Tiparse) यांच्या पथकाने छापा टाकून एक लाख ३० हजार ३०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत जुगारात सहभागी असलेल्या २० जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल (Case Filed) करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: जामखेड मधील हॉटेलमध्ये गोळीबार; हॉटेल मालक गंभीर जखमी

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे

अबिद रशिद बागवान, असद गफार शेख, गफार वजीर शेख (तिघे रा. मुकुंदनगर), सलमान महेबुब शेख, सोयल जैनु सय्यद, अमीर शेख सलीम (तिघे रा. घास गल्ली), शारूख रौफ कुरेशी, सौफियान रौफ कुरेशी (दोघे रा. फलटण चौकी), जमीर अब्दुल सय्यद, नदिम रियाज शेख, प्रकाश राजु घोरपडे, प्रकाश राजु लोखंडे (सर्व रा. घासगल्ली, कोठला) आरबाज खलील शेख, इरफान युसुफ पठाण (दोघे रा. कोठला चौक), अनिल भाउसाहेब खैरे, (रा. श्रमिक नगर, सावेडी), दीपक बाबू वाघमारे (रा. रामवाडी), विलास पद्माकर वराडे (रा.भिंगार), सलाउद्दीन सफर अली शेख (रा. सैनिकनगर, भिंगार), विष्णू धोंडीबा काळे (रा. संघर्ष चौक, सावेडी गाव), अन्सार गफूर शेख (रा. झेंडीगेट) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

नक्की वाचा : जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही: मुख्यमंत्री

पथकाने सापळा रचून टाकला छापा (Case Filed)

कोठला परिसरात तिराट नावाचा जुगार सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मिळालेल्या माहितीनुसार पथकाने छापा टाकला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक डॉ. टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे, अंमलदार गणेश चव्हाण, सचिन मिरपगार, सुजय हिवाळे, इनामदार, रमेश शिंदे यांच्या पथकाने कोठला येथील कुरेशी हॉटेलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये केली आहे.