Caste Certificate : नगर : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तसेच भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव येथे आयोजित कार्यक्रमात मसन जोगी समाज व काशी कापडी समाज बांधवांना जात प्रमाणपत्रांचे (Caste Certificate) वाटप करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार (Tehsildar) आकाश दहाडदे् यांच्या हस्ते कागदपत्रांचे वाटप झाले. त्यांनी समाज बांधवांना कागदपत्राचे महत्व समजावून सांगत शासनाच्या (Government) विविध शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक योजनांचा लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे किती उपयुक्त ठरणार आहेत याची सविस्तर माहिती दिली.
नक्की वाचा: मेल्यानंतरही मरण यातना; भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार!
आजचा दिवस हा भटक्या समाजासाठी सुवर्ण दिवस
भटके विमुक्त विकास परिषद, अहिल्यानगर जिल्हा संयोजक प्रवीण घाडगे यांनी आपल्या मनोगतात, “आजचा दिवस हा भटक्या समाजासाठी सुवर्ण दिवस आहे, कारण या कागदपत्रांच्या माध्यमातून समाजातील अनेकांना शैक्षणिक व शासकीय योजनांचे दरवाजे खुले होतील” असे सांगितले.
अवश्य वाचा : मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांसाठी कर्जतहून प्रेमाची शिदोरी
स्वातंत्र्यपूर्व काळात या समाजावर अमानुष अत्याचार (Caste Certificate)
कार्यक्रमात एकूण १०५ जात प्रमाणपत्रांचे वाटप भटके विमुक्त समाजातील लाभार्थ्यांना करण्यात आले. यावेळी ऐतिहासिक पार्श्वभूमीचा उल्लेख करण्यात आला. सन १८७१ मध्ये ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्रिबेस ऍक्ट (Criminal Tribes Act) अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित केले होते. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात या समाजावर अमानुष अत्याचार झाले. स्वातंत्र्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी हा कायदा रद्द करण्यात आला व या जातींना “विमुक्त जाती” म्हणून घोषित करण्यात आले. समाजाच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने ३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. भटके-विमुक्त समाज राज्याच्या व देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देत असून हा दिवस त्यांच्यासाठी सन्मानाचा ठरला.