Caste Validity Certificate : नगर : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी (Caste Validity Certificate) समितीकडे बनावट जात वैधता प्रमाणपत्र (Fake Caste Validity Certificate) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अश्विनी यशवंत दळवी (रा. भाळवणी, ता. पारनेर) हिच्याविरूध्द तोफखाना पोलीस (Police) ठाण्यात फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या दक्षता पथकाचे पोलीस निरीक्षक अजित नथु सावळे (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे.
नक्की वाचा : नगर-पुणे इंटरसिटी लाईनचे काम सुरू करा; खासदार लंके यांची संसदेत मागणी
कुणबी जाती दावा शैक्षणिक प्रकरण
गौरव यशवंत दळवी यांच्या नावाने तयार करण्यात आलेले बनावट जात वैधता प्रमाणपत्र अश्विनी दळवी यांनी त्यांच्या कुणबी जाती दावा शैक्षणिक प्रकरण दाखल करताना सादर केले. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रस्तुत प्रकरणाची छाननी केली असता गौरव दळवी यांच्या नावाने सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्र खोटे असल्याचे उघड झाले. समितीच्या अहवालानुसार, सदर क्रमांकाचे प्रमाणपत्र ज्योती सदाशिव काळे यांना निर्गमित करण्यात आले होते, असे समोर आले.
गैरफायदा घेण्यासाठी खोटे प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
समितीने या प्रकाराला गांभीर्याने घेतले असून, अश्विनी दळवी यांनी शासनाच्या धोरणाचा गैरफायदा घेण्यासाठी खोटे प्रमाणपत्र तयार करून सादर केले असल्याचे समोर आणले आहे. या प्रकारामुळे समितीची दिशाभूल होऊन सरकारी सवलतींचा गैरफायदा होऊ शकला असता. पोलीस निरीक्षक सावळे यांनी समितीच्या वतीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अश्विनी यशवंत दळवी हिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.