नगर : देशभरात सध्या सीबीआयचा चांगलाच दबदबा पाहायला मिळत आहे. त्यातच आता जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने (CBI) छापा टाकला आहे. दिल्ली शहरात एकूण ३० ठिकाणी हे छापे टाकले आहेत. सीबीआयने जलविद्युत प्रकल्प प्रकरणी छापा टाकला आहे. यापूर्वी त्यांनी विमा घोटाळ्याप्रकरणी मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तर जम्मू-काश्मीरमधील सत्यपाल मलिक आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या घरावर देखील याआधी छापे टाकण्यात आले होते.
नक्की वाचा : ‘मनोज जरांगे हे रोज खोटं बोलतात, रोज पलटी मारतात’- अजय महाराज बारस्कर
३०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप (Satyapal Malik)
समोर आलेल्या माहितीनुसार, किश्तवाडमधील किरू जलविद्युत प्रकल्पासाठी २,२०० कोटी रुपयांचे नागरी कामाचे कंत्राट देण्यात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात २०१९ मध्ये हा छापा टाकण्यात आला होता. २३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असलेले मलिक यांनी या प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मिटवण्यासाठी ३०० कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता.
अवश्य वाचा : आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला
सीबीआयने यापूर्वी सांगितले होते की, २०१९ मध्ये किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्टच्या सिव्हिल कामाचे सुमारे २,२०० कोटी रुपयांचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौधरी हे १९९४ च्या बॅचचे जम्मू-काश्मीर-केडर भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत.