CBSC : नगर : येणाऱ्या शैक्षणिक वर्षात (Academic Year) म्हणजेच 2025-2026 या वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून यंदाच्यावर्षी केवळ इयत्ता पहिलासाठी हा पॅटर्न लागू होणार आहे. राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांनी दिली. तसेच कुठलीही फी वाढ होणार नाही असे सांगितले.
नक्की वाचा : दरोड्याच्या तयारीत असलेले १० आरोपी गजाआड
अधिक माहिती देताना भुसे म्हणाले की,
पहिल्या टप्प्यात केवळ पहिलीच्या वर्गासाठी सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून पुढच्या वर्षी दोन टप्प्यात दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी लागू करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होऊन शैक्षणिक दर्जा वाढवण्यासही मदत होणार असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांनी सांगितले.
अवश्य वाचा १० कोटीसाठी अहिल्यानगरच्या व्यापाऱ्याचा खून
मराठीही असणारच, फीवाढ नाही (CBSC)
सीबीएससी पॅटर्नमध्ये आपल्याला 30 टक्क्यांपर्यंतची स्थानिक सवलत आहे. त्यामध्ये, महाराष्ट्राचा इतिहास, भुगोल, मराठी याला प्राधान्य देण्यात येईल. त्याप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. सीबीएससीची पुस्तकेही मराठीत तयार केली जातील. राज्यातील सर्वच शाळांना मराठी विषय बंधनकारक आहे, त्यात मराठीची डिग्री गरजेची असेल, असेही मंत्री दादा भुसे यांनी सांगितेल. तर, सीबीएससी पॅटर्न लागू केल्यामुळे कुठलीही फी वाढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.