CBSE | १० वी व १२ वीची उत्तरपत्रिका होणार डिजिटल; शिक्षक संगणकावर पेपर तपासणार

0

CBSE | नगर : सीबीएसई (CBSE) बोर्डाने एक मोठा निर्णय २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका स्कॅन करून डिजिटल स्वरुपात तयार करण्यात येणार आहेत. या डिजिटल उत्तरपत्रिकांना शिक्षक संगणकावर तपासून गुणदान करणार आहेत. 

हे वाचा – डोळ्यांनी अंध असली तरी ‘ती’ देणार डोळस न्याय!थान्या नाथन नेमक्या कोण ?

वेबीनार झाला

शुक्रवारी (ता. १३) सीबीएसईच्या वतीने नवी दिल्लीतून सीबीएसई शाळांसाठी वेबीनार पार पडला. त्यावेळी सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी ही माहिती दिली. ज्या शिक्षकांचा डेटा ओएसएस (ऑनलाइन एफिलेटेड स्कूल इन्फॉर्मेशन सिस्टम) प्रणालीत अपडेटेड आहे, त्याच शिक्षकांना हे काम करता येणार आहे.

अवश्य वाचा – होमगार्डला मारहाण; भिंगारमधील दोघांवर गुन्हा दाखल

उत्तपत्रिका स्कॅन केल्या जाणार

सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका शिक्षकांना प्रत्यक्ष हातात देण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर तपासण्यास दिल्या जाणार आहेत, संगणकावर तपासून तेथेच गुण द्यायचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तपत्रिका स्कॅन केल्या जाणार आहे. त्या तपासणीसाठी डिजिटल पोर्टलद्वारे शिक्षिकांना दिसणार आहेत. यातून परीक्षा पद्धतीतील वेळ व पैसे वाचणार आहेत. शिवाय वेबीनार पार पडलाही होईल.

हे पहा – ज्योतिषाच्या सल्ल्याने पेटला सूडाचा वणवा;पोटच्या मुलीनेच घेतला आईचा जीव

भारद्वाज यांनी केलेल्या प्रझेंटेशननुसार शिक्षकांसाठी डिजिटल पोर्टल आणि सराव डिजिटल मूल्यमापनासाठी बोर्डाकडून शिक्षकांना वैयक्तिक ‘लॉगिन क्रेडेंशियल्स’ (आयटी, पासवर्ड) दिले जातील. दहावी-बारावीच्या बोर्डाचे पेपर एआयद्वारे तपासले जाणार अशी अफवा विद्यार्थ्यांमध्ये आहे. पेपर एआयद्वारे तपासले जाणार नसून केवळ संगणकीय प्रणाली वापरण्यात येणार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here