CBSE Board : सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय;नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक टेस्ट

९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये ओपन बुक टेस्ट घेण्याचा विचार करत आहे. केंद्रिय माध्यमिक शिक्षक मंडळ हा नवीन प्रयोग करण्याच्या तयारीत आहे.

0
CBSE Board
CBSE Board

नगर : सीबीएसई म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (Central Board Of Secondary Education) नवीन अभ्यासक्रम फ्रेमवर्क करण्याच्या तयारीत आहे. याचाच एक भाग म्हणून ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये ओपन बुक टेस्ट (Open Book Test) घेण्याचा विचार करत आहे. केंद्रिय माध्यमिक शिक्षक मंडळ हा नवीन प्रयोग करण्याच्या तयारीत आहे.

नक्की वाचा : सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ओपन बुक टेस्ट देता येणार (CBSE Board )

माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाच्या काही निवडक शाळांमध्ये हा प्रयोग केला जाणार आहे. यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ओपन बुक टेस्ट देता येईल. तर दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांसाठी ओपन बुक टेस्ट घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या गणित आणि जीवशास्त्र या विषयांसाठी हा प्रयोग करण्यात येणार आहे.यामधून विद्यार्थ्यांवर या परीक्षेचा काय परिणाम होणार व ही परीक्षा देण्यासाठी किती वेळ लागतो, हे पाहिलं जाणार आहे.

अवश्य वाचा : ‘मनोज जरांगे मारुतीचं शेपूट; तो शांत बसणार नाही’: छगन भुजबळ

नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात प्रयोग राबवणार (CBSE Board )

नोव्हेंबर- डिसेंबर या महिन्यात विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर सीबीएसई बोर्डाच्या काही शाळांमध्येही परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सीबीएसईच्या अभ्यासक्रम समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. सीबीएसई बोर्डाने २०२४-२५ ते २०२६-२७ या कालावधीत नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन बुक टेस्ट राबवली होती. परंतु याचा चांगला फायदा न मिळाल्याने ही पद्धत बंद करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here