CBSE Education:सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न;राज्य सरकारचा मोठा निर्णय

0
CBSE Education:सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न;राज्य सरकारचा मोठा निर्णय
CBSE Education:सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न;राज्य सरकारचा मोठा निर्णय

CBSE Education : सध्या सरकारी शाळांपेक्षा सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या शाळांकडे मुलांचा कल वाढलेला पाहायला मिळत आहे. हेच लक्षात घेता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतलाय. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यास पॅटर्न राबवला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली.

नक्की वाचा : अखेर केंद्रीय कॅबिनेटकडून ‘एक देश एक निवडणूक’प्रस्तावाला मान्यता

सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार (CBSE Education)

सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे पालकांमध्ये विविध चर्चा सुरु आहेत. तिसरी ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम ठरला का? असा प्रश्न देखील उपस्थित झालाय. सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडे मुलांचा वाढता कल पाहता राज्याचे शिक्षणही दर्जेदार असावे, स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थी मागे पडू नयेत, यासाठी राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यासाठी तिसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला आहे. तो पुढील शैक्षणिक वर्षापासून शिकवला जाईल.

अवश्य वाचा : संत ज्ञानेश्वर सृष्टी निर्माणाचा आराखडा त्वरित सादर करा : मंत्री विखे पाटील

स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असून पाठ्यपुस्तकांची नवी आखणी, वेळापत्रकही बदलणार आहे. शिक्षक संघटनांशी चर्चा करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम लागू होणार आहे. ‘राज्यातील शिक्षण मंडळाच्या शाळांमधून शिकणारे विद्यार्थी बऱ्याचदा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतात, असे निरीक्षण आहे. आपल्या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here