CCTV : लोणी परिसरावर आता सीसीटीव्हीची नजर

CCTV : लोणी परिसरावर आता सीसीटीव्हीची नजर

0
CCTV : लोणी परिसरावर आता सीसीटीव्हीची नजर
CCTV : लोणी परिसरावर आता सीसीटीव्हीची नजर

CCTV : राहाता : लोणी पोलीस ठाणे (Loni Police Station) हद्दीत जिल्हा नियोजन समिती (District Planning Committee) अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक, लोणी खुर्द तसेच कोल्हार बुद्रुक गावातील नागरिकांच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसविण्यात आले आहे. 

नक्की वाचा : ढवळपुरी परिसराला गारपिटीचा तडाखा; काढणीला आलेली पिके मातीमोल, शेतकरी हवालदिल

आठ चौकांमध्ये एकूण ३३ सीसीटीव्ही कॅमेरे

या प्रकल्पांतर्गत लोणी गावातील २० चौकांमध्ये एकूण ८८ सीसीटीव्ही कॅमेरे, कोल्हार गावातील आठ चौकांमध्ये एकूण ३३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हा उद्घाटन सोहळा (ता. २१) मार्चला राज्याचे जलसंपदातथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांची उपस्थिती (CCTV)

यावेळी, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक  अहिल्यानगर सोमनाथ घार्गे,  अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर  सोमनाथ वाकचौरे  यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमास लोणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, कोल्हार – भगवतीपूर, प्रवरानगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.