Celebrities Voting :मुंबईत पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया;सेलिब्रिटींनीही बजावला मतदानाचा हक्क 

मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री सुकन्या मोने, स्पृहा जोशी, सुनील बर्वे, गौरव मोरे, आदिती सारंगधर, श्वेता मेहंदळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

0
Celebrities Voting
Celebrities Voting

नगर : देशभरात आज (ता.२०) पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक एकूण १३ मतदारसंघात हे मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावलाय. बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच मराठमोळ्या सेलिब्रिटींनीही आज मुंबईत (Mumbai) आपला मतदानाचा हक्क (Voting Rights) बजावला आहे.

नक्की वाचा : भारताच्या लेकीची गगन भरारी; पॅरा ॲथलेटिक्समध्ये पटकावले सुवर्णपदक

मराठी सेलिब्रिटींनी मुंबईत केले मतदान  (Celebrities Voting)

मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री सुकन्या मोने, स्पृहा जोशी, सुनील बर्वे, गौरव मोरे, आदिती सारंगधर, श्वेता मेहंदळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत अनेक सेलिब्रिटींनी “आम्हीही आमचा मतदानाचा अधिकार बजावून आलो आहोत, तुम्ही ही केलेत ना मतदान?” असं कॅप्शन देत फोटो शेअर केलेत.

अवश्य वाचा : आता फक्त पाडा म्हणालोय;विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावे लागेल – मनोज जरांगे

सेलेब्रिटींकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन  (Celebrities Voting)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, जान्हवी कपूर, फरहान अख्तर, झोया अख्तर, राजकुमार राव, परेश रावल, सान्या मल्होत्रा सह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. काल (ता. १९) अनेक सेलिब्रिटींनी मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. यामध्ये शाहरुख खान, अक्षय कुमारने नागरिकांनी मतदान करण्यास सांगितले आहे.

मुंबईत आज पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात हे मतदान होत आहे. यामध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, वायव्य मुंबई या जागांचा समावेश आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा १३ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here