Central Government : नगर : पंजाब (Punjab) मधील शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकार (Central Government) देत असलेल्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी व सरदार डल्लेवाल यांनी उपोषण (Fasting) सोडावे यासाठी ता. २० राज्यातील २० जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले, अशी माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanvat) यांनी दिली.
नक्की वाचा : ‘एकनाथ शिंदेंची राजकारणात बिकट अवस्था’- विजय वडेट्टीवार
कृषी मंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवावा
पंजाब आणि हरियाणा राज्यांच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुमारे एक वर्षा पासून सुरू आहे. कृषी मंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवावा, अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. अकरा महिने झाले तरी केंद्र सरकार या आंदोलनाची दखल घेण्यास तयार नसल्याने भारतीय किसान युनियन संघटनेचे अध्यक्ष सरदार जगजितसिंग डल्लेवाल यांनी उपोषणाला सुरु केले.
अवश्य वाचा : ‘सखा’ने पटकाविला ‘अहिल्यानगर महाकरंडक
सरकार बोलणी करण्यास तयार नाही (Central Government)
आज पंचावन्न दिवस उलटून गेले तरी सरकार बोलणी करण्यास तयार नाही. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय आंदोलन करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनिल घनवट, विक्रम शेळके, नीलेश शेडगे, वामनराव भदे, कारभारी गवळी, अशोक सब्बान, महादेव खामकर आदींसह नागरिक उपस्थित होते.