Chain Snatching : नगर : शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या नवलेनगर चौकात महिलेला धक्काबुक्की करून तिच्या गळ्यातील सोनसाखळी स्नॅचिंग (Chain Snatching) करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद केले. त्यांच्याकडून एक लाख ८९ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले. बिरजा राजू जाधव (वय २३, रा. मकासरे चाळ, कायनेटिक चौक, नगर), कृष्णा मुकेश रनशूर (वय १९, रा. समाज मंदिराजवळ, वाकोडी, ता. नगर) व कुंदन लक्ष्मण कांबळे (वय २५, रा. समाज मंदिराजवळ, वाकोडी, ता. नगर) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत.
हे देखील वाचा: ‘मराठा एक झाल्याने पंतप्रधान मोदी गोधड्या घेऊन महाराष्ट्रात मुक्कामी’- मनोज जरांगे
७ ग्रॅम वजनाच्या सोनसाखळीची चोरी (Chain Snatching)
कांता पुरी या गुरुवारी (ता. २) सायंकाळी ६ वाजता नवलेनगर चौकातून चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कांता पुरी यांना धक्काबुक्की करत त्यांच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून नेली. या संदर्भात कांता पुरी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा: सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवालांना दिलासा! १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात (Chain Snatching)
घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट दिली. तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात एका संशयित आरोपीची ओळख पथकाला पटली. संशयित आरोपी हा त्याच्या साथीदारांसह वाकोडी फाटा ते वाकोडी रस्त्यावर येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. जेरबंद आरोपींपैकी बिरजा जाधव हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी ११ गुन्हे दाखल आहेत. तर कुंदन कांबळेवर एक गुन्हा दाखल आहे. पथकाने जेरबंद आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले.