Chain snatching : नगर : नगर शहर, संगमनेर व लोणी परिसरात चेन स्नॅचिंग (Chain snatching) करणाऱ्या नाशिक येथील आरोपीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडील ५० ग्रॅम वजनाचे चोरी केलेले सोन्याचे दागिने पथकाने हस्तगत केले. विनोद गंगाराम पवार (वय ४०, रा. सिडको झोपडपट्टी, भगतसिंग नगर, जि. नाशिक) असे जेरबंद आरोपीचे (Accused) नाव आहे.
नक्की वाचा : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू
जबरी चोरीचा गुन्हा दाखल
वटपौर्णिमेच्या दिवशी (ता. २१) नगरच्या सावेडी उपनगरातील रेणावीकर नगर परिसरात कल्पना गांगुर्डे या रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी गांगुर्डे यांना अडविले. कल्पना गांगुर्डे यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून बळजबरीने हिसकावून नेले. गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला.
अवश्य वाचा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरीत रास्ता रोको आंदोलन
विनोद हा सराईत गुन्हेगार ; आठ गुन्हे दाखल (Chain snatching)
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चैन स्नॅचिंग केलेल्या ठिकाणावरून सीसीटीव्ही फुटेज संकलित केले. या फुटेजमधील आरोपी हा विनोद पवार या नाशिकमधील आहे. पथकाला माहिती मिळाली की आरोपी विनोद पवार हा त्याच्या साथीदारांसह तारकपूर बसस्थानकात आहे. त्यानुसार पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. मात्र, त्याचा साथीदार किशोर धोत्रे (रा. शांतीनगर, नाशिक) हा पसार झाला. पथकाने जेरबंद आरोपीकडे चोरीच्या सोन्याबाबत विचारपूस केली असता त्याने हे सोने राहाता येथील एका सुवर्ण व्यासायिकाला वडिलांची तब्बेत ठिक नसल्याचे कारण देत विकले. त्यानुसार पथकाने सुवर्ण व्यावसायिकाकडून १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, १५ ग्रॅम वजनाचे मिनीगंठण, २० ग्रॅम वजनाचे गंठण असे ५० ग्रॅम वजनाचे तीन लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोने हस्तगत केले. विनोद हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत. पथकाने जेरबंद आरोपीला पुढील तपासासाठी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.