Chain snatching : नेवासा व भिंगारमध्ये चैन स्नॅचिंग करणारा आरोपी जेरबंद

Chain snatching : नेवासा व भिंगारमध्ये चैन स्नॅचिंग करणारा आरोपी जेरबंद

0
Chain snatching : नेवासा व भिंगारमध्ये चैन स्नॅचिंग करणारा आरोपी जेरबंद

Chain snatching : नगर : नेवासा व भिंगार परिसरात चैन स्नॅचिंग (Chain snatching) करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद केले. पोपट लक्ष्मण नरोडे (रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) असे जेरबंद आरोपीचे (Accused) नाव आहे.

अवश्य वाचा: भिस्तबाग महाल नगर शहराचे पर्यटन केंद्र बनले – संग्राम जगताप

४० हजारांचे मंगळसूत्र नेले होते तोडून

जिजाबाई बुळे या त्यांच्या पतीसह दुचाकीवरून हंडी निमगाव (ता. नेवासा) येथून जात असताना दुचाकीवरून ५ ऑगस्ट रोजी जात होत्या. त्यावेळी अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आला. त्याने बुळे यांच्या दुचाकीला वाहन अडवे लावून तुम्ही माझ्या आईच्या अंगावर का थुंकला? असे म्हणत जिजाबाई बुळे यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून नेले. या संदर्भात बुळे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

नक्की वाचा: पुरुषोत्तम करंडकात नगरचा डंका! नगरच्या’या’ एकांकिकेने मारली बाजी

पथकाने सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात (Chain snatching)

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. पथकाला माहिती मिळाली की, हा गुन्हा पोपट नरोडे याने केला आहे. तो नगर शहरातील तपोवन रस्त्यावर आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पथकाने अधिक विचारपूस केली असता आणखी चार ठिकाणच्या चैन स्नॅचिंग घटनांची उकल झाली आहे. यात नगर शहरातील शनी चौक, नेवासा, राहुरी व भिंगार कॅम्प परिसरातील चैन स्नॅचिंग घटनांचा समावेश आहे.