Chain Snatching : अहिल्यानगर शहरात चेन स्नॅचिंग; अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास

Chain Snatching : अहिल्यानगर शहरात चेन स्नॅचिंग; अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास

0
Chain Snatching : अहिल्यानगर शहरात चेन स्नॅचिंग; अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास
Chain Snatching : अहिल्यानगर शहरात चेन स्नॅचिंग; अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास

Chain Snatching : नगर : अहिल्यानगर शहरातील बुरूडगाव रस्त्यावरील केशर गुलाब मॉल परिसरात दुचाकीवरून (Two Wheeler) आलेल्या अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी (Gold Chain) हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Police Station) विवेक पांडुरंग खाकाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : संगमनेरमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या ९ गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

दुचाकीवरून आले हेल्मेटधारी चोर

सदरील घटना काल (ता. ६) सायंकाळी ७.३० ते ७.४५ वाजण्याच्या सुमारास शिवाजी हाऊसिंग सोसायटी, केशर गुलाब मॉलसमोर घडली. फिर्यादी महिला पायी फिरत असताना दुचाकीवरून आलेल्या हेल्मेटधारी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २ लाख ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. 

नक्की पहा : चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप; दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

सतर्क राहण्याचे आवाहन (Chain Snatching)

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.