Champa Shashti नेवासा : चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने खंडोबा देवाची सासुरवाडी व आदिमाया शक्ती म्हाळसादेवीचे माहेर असलेल्या नेवासा बुद्रुक (Newasa budruk) येथील खंडोबा-म्हाळसादेवी मंदिराच्या प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताहाचे (Akhand Harinam week) आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने दहीहंडी (Yogurt) फोडून करण्यात आली.
नक्की वाचा : पिंपळगाव माळवी येथील मंदिरात चोरी करणारा जेरबंद
यावेळी प्रपंचातील सुख अनुभवायचे असेल तर त्याला परमार्थाची जोड द्या आणि मानवी जीवनातील व्यथा दूर करण्यासाठी जीवनात भगवंताचे ध्यान करून नामस्मरण करा असे आवाहन उद्धव महाराज मंडलिक यांनी बोलताना केले. यावेळी श्री खंडोबा म्हाळसादेवी सच्चिदानंदबाबा नारदमुनी मंदिराचा चौथा वर्धापनदिन व चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्ताने झालेल्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी उद्धव महाराज मंडलिक यांचे संतपूजन करण्यात आले. हे संतपूजन खंडोबा म्हाळसादेवी नारदमुनी, सच्चिदानंद बाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.मुरलीधर कराळे,अशोक मारकळी,रविंद्र मारकळी,रमेश काशीद, एकनाथ डोहोळे,सुभाष जपे,अशोक काळे,रावसाहेब पेचे आदींच्या हस्ते पार पडले.
अवश्य वाचा : शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित
यावेळी झालेल्या कीर्तन सोहळयात बोलताना महंत उध्दवजी महाराज मंडलिक म्हणाले की, खंडोबाराय हे भगवान शंकराचा अवतार असून म्हाळसादेवी हया आदिमाया आदिशक्ती पार्वतीमातेचे अवतार आहे. भगवान परमात्म्याची सेवा ही अंतकरणापासून झाली पाहिजे, भगवंताच्या भक्तीचा ध्यास लागला पाहिजे, त्याची शक्ती मान्य केली की देव मान्य झाला हे सिद्ध होते,जीवनात कोणत्याही क्षेत्रात काम करत असतांना मनुष्याने ते मन लावून व चांगल्या भावनेने करावे कारण परमात्मा हेच विश्वाचे जीवन असल्याचे त्यांनी सांगितले.
अंतःकरणाला विसावा मिळण्यासाठी भगवंताच्या जवळ व सानिध्यात गेले पाहिजे, भगवंताकडे जाण्यासाठी भक्ती हे साधन असून मनुष्य जीवाची तळमळ थांबवायची असेल व खरा विसावा प्राप्त करायचा असेल तर संत संगतीची कास धरून परमार्थ करा,असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी चंपाषष्ठी सोहळयात व धार्मिक कार्यात योगदान देणाऱ्या दात्यांचा व सेवेकऱ्यांचा उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
काल्याची दहीहंडी फोडून व महाआरतीने आठ दिवस चाललेल्या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांना बाजरी भाकरी व वांग्याचे भरीत प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण मंडळे, विश्वस्त मंडळ सेवेकरी ग्रामस्थांनी मोलाची भूमिका बजावली. यावेळी झालेल्या सांगता प्रसंगी संत तुकाराम महाराज मंदिराचे सेवेकरी भागवत कथाकार अंकुश महाराज कानडे, विजय महाराज पवार, ज्ञानेश्वर महाराज पेचे, गायनाचार्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे, बाबासाहेब महाराज सातपूते, कृष्णा महाराज हारदे, मृदंगाचार्य प्रसाद महाराज तरवडे, गायनाचार्य शंकर महाराज तनपुरे, बबनराव धस, बदाम महाराज पठाडे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.