Weather Update:राज्यात पुन्हा पावसाची शक्यता,मराठवाड्यासह महाराष्ट्रातील ‘या’जिल्ह्यांना यलो अलर्ट

0
Weather Update
Weather Update

Weather Update : राज्यात सध्या वातावरण सातत्याने बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी ऊन पडल्याचं दिसत आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. मात्र गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची हजेरी (Rain) पाहायला मिळाली आहे. आजही मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

नक्की वाचा : ओबीसींच्या न्याय हक्क व अधिकारासाठी लढणार : प्रा. लक्ष्मण हाके

राज्यात पुढील २४ तासात दमदार पावसाची हजेरी (Weather Update)

राज्यात पुढील २४ तासात विविध भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळासह ३०-४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा : नगर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट (Weather Update)

मुंबईत मागील काही तासांत काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह कल्याण,डोंबिवलीमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळाली आहे. पुढील काही तासांत शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३°C आणि २६°C च्या आसपास असेल. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, चंद्रपूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मागील २४ तासांसाठी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here