Weather Update : राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत असताना पुन्हा एकदा पावसासाठी (Rainy Season) पोषक वातावरण तयार झाल्याची परिस्थिती आहे. यामुळे आज (बुधवार)पासून चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपासून नंदूरबार (Nandurbar) येथे खिळलेला परतीचा पाऊस येत्या काही दिवसात राज्यात सगळीकडे जोरदार हजेरी लावण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा : ‘माझी राजकीय भूमिका पवार साहेबांच्या संमतीनेच’-अजित पवार
राज्यात आज कुठे पाऊस होणार? (Weather Update)
विदर्भातील ११ जिल्ह्यात तर अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १० जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला. दुसरीकडे मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मराठवाडा क्षेत्रात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,मान्सूनने आतापर्यंत जम्मू आणि काश्मीर, लडाख-गिलगिट-बाल्टीस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा, तसेच चंदीगड दिल्ली, राजस्थानच्या सर्व भागातून माघार घेतली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातूनही मान्सून माघारी परतला आहे.
अवश्य वाचा : कोणत्याच पक्षात आम्हाला हरवण्याची ताकद नाही : देवेंद्र फडणवीस
हवामान विभागाचा विविध जिल्ह्यांना पावसाचा इशारा (Weather Update)
मान्सूनने आतापर्यंत पूर्णपणे माघार घेतलेली नाही. गेल्या चार दिवसापासून नंदुरबारमध्ये खिळलेला परतीचा पाऊस पुढील ४८ तासांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालय. त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील विवीध जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उद्या म्हणजेच गुरूवारीही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा कडाका देखील वाढणार आहे.