Chandrasekhar Bawankule : शनिशिंगणापूर देवस्थानाला न्याय देऊ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या आश्वासनानंतर उपाेषण मागे

Chandrasekhar Bawankule : नेवासा : श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर (Shanishinganapur) देवस्थानमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करा, हे देवस्थान सरकार जमा करण्यात यावे, ताडतीने या देवस्थानावर प्रशासक नेमावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी आपल्या निष्ठावान समर्थकांसह गुरुवार (ता. ३०) देवस्थानासमाेर आमरण उपोषण सुरु केले.

0
Chandrasekhar Bawankule : शनिशिंगणापूर देवस्थानाला न्याय देऊ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या आश्वासनानंतर उपाेषण मागे
Chandrasekhar Bawankule : शनिशिंगणापूर देवस्थानाला न्याय देऊ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या आश्वासनानंतर उपाेषण मागे

Chandrasekhar Bawankule : नेवासा : श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर (Shanishinganapur) देवस्थानमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करा, हे देवस्थान सरकार जमा करण्यात यावे, ताडतीने या देवस्थानावर प्रशासक नेमावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी आपल्या निष्ठावान समर्थकांसह गुरुवार (ता. ३०) देवस्थानासमाेर आमरण उपोषण सुरु केले. यावर भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड, (Bhagwat Karad) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उपाेषणाची दखल घेत आज उपाेषणकर्त्यांची भेट घेतली. येत्या हिवाळी अधिवेशनामधे लक्षवेधी करुन शनिशिंगणापूर देवस्थानला न्याय देऊ, असे बावनकुळे यांनी आश्वासन दिल्यानंतर अखेर उपाेषण मागे घेण्यात आले, अशी माहिती उपाेषणकर्ते शेटे यांनी दिली.

Chandrasekhar Bawankule : शनिशिंगणापूर देवस्थानाला न्याय देऊ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या आश्वासनानंतर उपाेषण मागे
Chandrasekhar Bawankule : शनिशिंगणापूर देवस्थानाला न्याय देऊ; चंद्रशेखर बावनकुळेंच्या आश्वासनानंतर उपाेषण मागे

हे देखील वाचा : आरक्षणाचा तिढा, उपाय काय?; पाेपटराव पवारांनी सांगितला ताेडगा

या उपोषणाला भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, अशोक टेमक, सरपंच भरत बेल्हेकर, बंडूभाऊ शिंदे, सतीश गडाख, संदीप कुसळकर, प्रतीक शेजूळ, सचिन भांड, अमोल साठे, प्रताप चिंधे, नानासाहेब ढेरे, संदीप दरंदले, संभाजी गडाख, अरुण चांदघोडे, भाऊसाहेब बेल्हेकर, गणेश चौघुले, काशिनाथ ढेरे, ज्ञानदेव ढेरे, संभाजी राशीनकर, प्रकाश ढेरे, बाळासाहेब साबळे, हर्षद शिरसाठ आदी उपस्थित हाेते. उपोषणकर्त्यांनी देवस्थानात होणारा भ्रष्टाचार थांबविण्याची तसेच देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करुन देवस्थान सरकार जमा करण्याची एकमुखी मागणी केली. उपोषणकर्त्यांची केंद्रीय मंत्री कराड व प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी समक्ष भेट घेतली. देवस्थानच्या भ्रष्ट कारभाराबाबत उपोषणकर्त्यांकडून

नक्की वाचा : काँग्रेसच्या दुर्दैवी वाताहतीला पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार; मंत्री विखे पाटलांची टीका

वस्तुस्थिती समजून घेतली. देवस्थानाबाबत हिवाळी अधिवेशात लक्षवेधी मांडून देवस्थानला न्याय देऊ, असे आश्वासन दिल्यानंतर उपाेषण मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here