Chandrashekhar Bawankule:’महसूल विभागात वशिला- शिफारशी चालणार नाहीत’-चंद्रशेखर बावनकुळे

0
Chandrashekhar Bawankule:'महसूल विभागात वशिला- शिफारशी चालणार नाहीत'-चंद्रशेखर बावनकुळे
Chandrashekhar Bawankule:'महसूल विभागात वशिला- शिफारशी चालणार नाहीत'-चंद्रशेखर बावनकुळे

नगर : राज्याच्या महसूल विभागात (Revenue Department) यापुढे शिफारशी किंवा वशिल्याने (Recommendation or suggestion) कोणतीही बदली होणार नाही.बदली-बढतीच्या कामासाठी कोणावरही मंत्रालयात येण्याची वेळ येऊ नये,अशी आपली भूमिका असून शासनाचा चेहरा असलेल्या या महत्त्वाच्या विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी यापुढे ‘भ्रष्टाचार बंद’ असे खणखणीत धोरण राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी रविवारी (ता.२३) जाहीर केले.

नक्की वाचा : राज्यात उन्हाच्या झळा तीव्र होणार;’या’ठिकाणी पाऊस बरसणार  

‘अधिकारी-कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार’  (Chandrashekhar Bawankule)

महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्याला या विभागाचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्ह्याचे पालकत्त्व सांभाळणारे अतुल सावे हे दोन्ही मंत्री उपस्थित होते. रविवारी रात्री पार पडलेल्या समारंभात अध्यक्षस्थानाहून बोलताना बावनकुळे यांनी कोतवालापासून अपर जिल्हाधिकार्‍यापर्यंतच्या अधिकारी-कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्न तसेच त्यांच्या मागण्या मार्गी लावण्याची ग्वाही आपल्या भाषणात दिली.

अवश्य वाचा : भगवद् गीतेवर हात ठेवून काश पटेल यांनी घेतली एफबीआयच्या संचालक पदाची शपथ  

‘यापुढे भ्रष्टाचार बंद’ (Chandrashekhar Bawankule)

बावनकुळे पुढे म्हणाले की, महसूल विभागात माझ्याच कार्यालयात तब्बल १२ हजार प्रकरणे निर्णयासाठी पडून आहेत. रोज शंभर सुनावण्या घेतल्या तरी आपण सर्वांना न्याय देऊ शकणार नाही, असे नमूद करून यापुढे सर्व महसुली कार्यालयांमध्ये एआय तंत्राचा वापर करून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याच्या वाळू धोरणात आमुलाग्र बदल केले जाणार असून हा विषय आम्ही सार्वजनिक अधिक्षेत्रांत टाकला आहे. त्याचे चांगले परिणाम पुढील काळात दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अधिकारी-कर्मचार्‍यांचे मेरिट पाहूनच बदल्या होतील. शिफारशी आणि वशिला चालणार नाही. यापुढे भ्रष्टाचार बंद,असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here