Chandrashekhar Bawankule : राज्यातील देवस्थान,वतन जमिनींच्या खरेदी-विक्री (Purchase and sale of temple lands) व्यवहारांवर आता तात्पुरता ब्रेक (Brake) लावण्यात आला आहे.शासन धोरण ठरविले जाईपर्यंत अशा जमिनींची नोंदणी प्रक्रिया थांबवण्याचे स्पष्ट आदेश नोंदणी व मुद्रांक विभागाने दिले आहेत. मंगळवार (ता.१३) महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी हे निर्देश दिले आहेत.
नक्की वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?
नक्की निर्णय काय? (Chandrashekhar Bawankule)
पुणे येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या उपमहानिरीक्षक कार्यालयातून जारी झालेल्या परिपत्रकानुसार, शासन धोरण ठरवण्यात येईपर्यंत कोणत्याही देवस्थान इनाम मिळकतींच्या दस्तऐवजांची नोंदणी करता येणार नाही. हा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली, कोल्हापूरचे पालकमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १३ मे रोजी झालेल्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला. राज्यात देवस्थान व इनामी जमिनी मोठ्या प्रमाणावर असून जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारांवर सरकार धोरण ठरवत आहे. या बैठकीत देवस्थान वतन जमिनींवरील अनधिकृत व्यवहार थांबवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यावर एकमत झाले. या आदेशामुळे सध्या सुरू असलेले अनेक व्यवहार थांबवावे लागणार आहेत. शासन धोरण जाहीर होईपर्यंत कोणतीही नोंदणी करता येणार नाही.
अवश्य वाचा : दहावीचा निकाल जाहीर;महाराष्ट्रात मुलींनीच मारली बाजी
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?(Chandrashekhar Bawankule)
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवस्थान इनाम मिळकतीच्या अनुषंगाने शासनस्तरावर धोरण ठरविणे सुरु आहे. त्यामुळे सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय किंवा न्यायालयाच्या आदेशांशिवाय राज्यातील सर्व देवस्थानच्या खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी केली जाऊ नये.जर व्यवहार झाले तर त्यास दुय्यम निबंधक यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.या बैठकीला मंत्री आबिटकर,आमदार अमल महाडिक तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.