नगर : बदललेला काळ, चलनवाढ (Inflation) आणि बदलत्या अर्थव्यवस्थेचा प्रवास या नुसार पैशाचे मूल्य (Value for money) आणि एकूण आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. १९४७ म्हणजे स्वातंत्र्याचा काळ. १९४७ मध्ये १ रुपयांमध्ये वस्तू विकत घेता येत होत्या. मात्र आज तुम्हाला काहीच मिळत नाही. तेव्हापासून आजतागायत जीवनावश्यक वस्तूंपासून ते चैनीच्या वस्तूंपर्यंत किती रुपयांचा बदल (Change) झाला हे जाणून घ्या..
नक्की वाचा : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास
चांदी (Inflation)
१९४७ मध्ये चांदीची किंमत १.४० रुपये प्रति १० ग्रॅम होती.
चांदीची किंमत आता ९७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

रुपया (Inflation)
आता १ यूएस डॉलरची किंमत ८६ रुपये आहे.
१९४७ मध्ये १ रुपयाची किंमत ०.२५ यूएस डॉलर होती.

पेट्रोल
१९४७ मध्ये पेट्रोलची किंमत ०. २७ रुपये प्रति लिटर होती.
आता पेट्रोलचा दर ९४-१०५ रुपये प्रतिलिटर झाला आहे.

दूध :
१९४७ मध्ये दुधाचा भाव ०.१२ रुपये प्रति लिटर होता.
दुधाचा दर आता प्रतिलिटर ७० रुपयांच्या पुढे आहे.

तूप :
१९४७ मध्ये तुपाची किंमत १.५० रुपये प्रति किलो होती.
तुपाचा भाव आता ६०० रुपये किलोच्या आसपास आहे.

घरभाडे :
१९४७ मध्ये सरासरी घरभाडे १० ते २० रुपये प्रति महिना होते.
आता मेट्रोपॉलिटन शहरात 2BHK अपार्टमेंटची किंमत दरमहा तेस ते चाळीस हजार रुपये आहे.

जमिनीची किंमत :
१९४७ मध्ये जमिनीची किंमत (शहरी भागात प्रति एकर) ५०० -१५०० रुपये होती.
आता जमिनीची किंमत ५ कोटी ते ५०कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे.

सायकल :
१९४७ मध्ये सायकलची किंमत २०-२५ रुपये होती.
आता सायकलची किंमत अंदाजे ५००० रुपये आहे.

कार :
१९४७ मध्ये कारची (हिंदुस्थान १० मॉडेल) किंमत १२००० रुपये होती.
आता एंट्री-लेव्हल कारची किंमत सुमारे ५,००,००० रुपये आहे.

अश्या पद्धतीने १९४७ ते २०२५ पर्यंत बदलत्या काळानुसार वस्तूंची किंमत झपाटाने बदलल्याचे पाहायला मिळाले आहे.
अवश्य वाचा : रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ