10th syllabus:दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल,विषयांची संख्या वाढणार 

0
10th syllabus:दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल,विषयांची संख्या वाढणार 
10th syllabus:दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल,विषयांची संख्या वाढणार 

10th Syllabus : विद्यार्थ्यांसाठी आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कारण नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात (10th Syllabus) मोठा बदल होणार आहे.आता विद्यार्थ्यांना सात,आठ नाही तर तब्बल १५ विषयांचा अभ्यास करावा लागणाार आहे. विषय वाढल्याने शाळांची वेळ (School Time) देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नक्की वाचा : ‘मुख्यमंत्री व्हायचं असेल तर खूप उठा-बशा’-जयंत पाटील

आतापर्यंत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सात ते आठ विषय होते. मात्र नव्या आराखड्यानुसार यामध्ये भर पडल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण आणि आंतरविद्याशाखा विषय बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच तीन भाषा, विज्ञान, गणित, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेले तीन असे दहा विषय विद्यार्थ्यांना असणार आहे. याशिवाय स्काऊट गाईड हे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.

अवश्य वाचा : उज्जैनच्या निकिता पोरवालने पटकावला ‘मिस इंडिया’चा किताब

नवीन शैक्षणिक धोरणात बदल (10th syllabus)

नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा बदल करण्यात आहे.हा बदल करताना भारतीय भाषांची सक्ती करण्यात आली. तसेच मुख्य विषयांचा ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, याबाबत विचार करण्यात आलाय. आता यासंदर्भात शाळांकडून सूचना आल्यानंतर त्याचा अभ्यास करुन हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. व्यावसायिक शिक्षणामध्ये नववीसाठी विद्यार्थ्यांना शेती, नळ दुरूस्ती, सौंदर्य  या व्यवसायांची ओळख करून देण्यात येईल तर दहावीला बागकाम, सुतारकाम, परिचर्या या व्यवसायांची ओळख करून देण्यात येईल. कलाशिक्षणात दृश्यकला, नाट्य, संगीत, नृत्य,लोककला या सर्वांची ओळख करून देण्यात येईल. या विषयाला श्रेणी देण्यात येईल. सादरीकरण, शिक्षकांचे निरिक्षण, विद्यार्थ्यांचे स्वयंमूल्यमापन, गट कामगिरी, कल्पकता याआधारे मूल्यमापन करण्यात येईल.

दहावीमध्ये दोनऐवजी तीन भाषांची सक्ती (10th syllabus)

दहावी मध्ये दोनऐवजी तीन भाषांची सक्ती असणार आहेत. त्यातील दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे. तसेच अकरावी-बारावीत एक ऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल. त्यातही एक भारतीय भाषा असणार आहे. तसेच नववी-दहावीत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी विषयांची संख्या वाढवली आहे. पाच ऐवजी दहा विषय शिकावे लागणार आहेत. त्यात तीन भाषा तर सात मुख्य विषय असणार आहेत. या विषयांमध्ये गणित, संगणक शास्त्र, सामाजिक शास्त्र, विज्ञान, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण यांचा समावेश आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here