Char Dham Yatra Guidelines: चारधाम यात्रेदरम्यान रील बनवण्यावर बंदी;सरकारकडून नवा आदेश जारी

चारधाम यात्रेदरम्यान मंदिरांच्या साधारण ५० मीटरच्या परिसरात मोबाईल वापरण्यासाठी एसओपी जारी केली असून ५० मीटर मंदिर परिसरात संपूर्ण रील आणि व्हिडिओ बनविण्यास बंदी घालण्यात आली आहे.

0
Char Dham Yatra Guidelines
Char Dham Yatra Guidelines

नगर : भाविक प्रतीक्षा करत असलेल्या चारधामच्या यात्रेला १० मे २०२४ पासून सुरु झाली आहे. त्यात केदारनाथ आणि गंगोत्री, यमुनोत्रीसह चारधामचे दर्शन करण्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत. दरम्यान उत्तराखंड सरकारने (Uttarakhand Government) इथे येणाऱ्या भाविकांसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे, ज्या आदेशात चारधाम यात्रेला आलेल्या प्रत्येक यात्रेकरुंना मंदिराच्या ५० मीटरच्या परिसरात व्हिडिओ आणि रील बनविण्यासाठी बंदी (ban To Make Reel) घालण्यात आली आहे.

नक्की वाचा : ५ घरफोड्याच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीला कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

५० मीटर मंदिर परिसरात रील आणि व्हिडिओ बनविण्यास बंदी (Char Dham Yatra Guidelines)

सध्या सोशल मीडियावर रील बनवणे ही सवय प्रत्येक व्यक्तीला लागलेली आहे. त्यातला एक विषय म्हणजे, अनेक व्यक्ती फक्त रिल बनवण्यासाठी चारधामची यात्रा करतात असे दिसून आले. त्यामुळे मंदिराच्या परिसरात अनावश्यक गर्दी होताना दिसून येते. तर दुसऱ्या बाजूला भक्तीभावाने दर्शनाला आलेल्या भाविकांना या गोष्टींचा नाहक सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. 

नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, चारधाम यात्रेदरम्यान मंदिरांच्या साधारण ५० मीटरच्या परिसरात मोबाईल वापरण्यासाठी एसओपी जारी केली असून ५० मीटर मंदिर परिसरात संपूर्ण रील आणि व्हिडिओ बनविण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र या सर्वांवर पोलीस प्रशासन एकदम बारकाईने लक्ष ठेवणार आहे.

अवश्य वाचा : टी-२० वर्ल्ड कपच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

३१ मे पर्यंत चारधाममध्ये व्हीआयपी दर्शन बंद (Char Dham Yatra Guidelines)

उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव असलेले राधा रतुरी यांनी हा आदेश जाही केलाय. शिवाय चारधाम यात्रेसंबंधीत कोणतीही चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर प्रशासन गुन्हा दाखल करणार असल्याचे ही, राधा रतुरी म्हणाले. या सर्वांवर उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी सांगितले की, शुक्रवार ३१ मे पर्यंत चारधाममध्ये व्हीआयपी दर्शन बंद असून हरिव्दार आणि ऋषिकेशमध्ये ऑफलाईन नोंदणी रविवार १९ मे पर्यंत बंद राहील. मंदिर परिसराच्या ५० मीटरपर्यंत व्हिडिओग्राफी आणि रील मोठ्या प्रमाणात तयार केले जातात आणि एकाच ठिकाणी असंख्य लोक जमतात,त्यामुळे अनेक भाविकांची गैरसोय होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here