Chemical mixed water : ओढ्यात सोडले रसायनमिश्रित पाणी

Chemical mixed water : ओढ्यात सोडले रसायनमिश्रित पाणी

0
Chemical mixed water : ओढ्यात सोडले रसायनमिश्रित पाणी
Chemical mixed water : ओढ्यात सोडले रसायनमिश्रित पाणी

Chemical mixed water : पारनेर: अहिल्यानगर – पुणे महामार्गावर (Ahilyanagar – Pune highway) सुपा जांभूळ ओढा येथे अज्ञात टॅंकर चालकाने केमिकल टँकर (Chemical mixed water) खाली केल्याने वाघुंडे शिवारातील शेतकऱ्यांच्या विहरींना केमिकल पाण्याचा तवंग आला असून शेतमाल, पिण्याच्या पाण्यासह (Drinking water) शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नक्की वाचा : आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या; समोरून येणाऱ्या ट्रेनने धडक दिल्याने ११ जणांचा मृत्यू

याबाबत सविस्तर माहिती अशी की,

अहिल्यानगर-पुणे माहामार्गावरील सुपा वाघुंडे शिवारातील जांभूळ ओढा येथील पुलावरुन एका केमिकल टँकर चालकाने केमिकलने भरलेला टँकर ओढ्यात खाली केल्याने सदर टँकरमधील केमिकलने ओढ्यातील तसेच शेतकऱ्यांच्या विहरीतील पाणी पुर्णपणे दूषित केले. ओढ्यालगतच्या सर्व विहिरीवर केमिकलचा तवंग आला आहे. तसेच संपूर्ण ओढ्यातील पाण्यात केमिकल मिसळले आहे. त्या रसायनाने काही तासात ओढ्यातील गवत जळले असून संपूर्ण विहीर केमिकलयुक्त पाण्याने व्यापली आहे.

अवश्य वाचा : …’त्या’ वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

शेतकऱ्यांनी सुपा पोलीस ठाण्यात दिली तक्रार (Chemical mixed water)

केमिकल मिश्रीत पाणी ओढ्यात सोडल्याने संपत दादाभाऊ मगर, बबन दादाभाऊ मगर, रविद्र दत्ताञय मगर, संपत नाथा मगर, भाऊसाहेब नामदेव मगर, हारकू किसन मगर, वसंत पांडुरंग मगर या शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवेलमध्ये केमिकल युक्त पाणी मिसळले असून यात शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतमालाच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. सदर शेतकऱ्यांनी सुपा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शेतकरी सदर केमिकल सोडणाऱ्या टँकर चालकाचा शोध घेत आहेत. या केमिकलयुक्त पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घेतले आहेत. ओढ्यात सोडलेले हे पाणी अ‍ॅसिडयुक्त असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.