Cheque Bounce : चेक बाऊन्स प्रकरणी ‘या’ आराेपीस नुकसान भरपाई, कैदेची शिक्षा

Cheque Bounce : चेक बाऊन्स प्रकरणी 'या' आराेपीस नुकसान भरपाई, कैदेची शिक्षा

0
Cheque Bounce

Cheque Bounce : नगर : धनादेश न वटल्याच्या (Cheque Bounce) फौजदारी खटल्यात आरोपी अंजुश्री महेश संचेती (रा. विनायक नगर, नगर) यांच्यावर आरोप सिद्ध झाले आहे. नगर येथील अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी बी. व्ही. दिवेकर यांनी आरोपीस दोषी धरून १२ महिने साध्या कारावासाची शिक्षा (Sentence of simple imprisonment) तसेच फिर्यादी विनायक दत्तात्रय भोकरे रक्कम रुपये अडीच लाख तसेच धनादेश न वटल्यापासून ९ टक्के दराने नुकसान भरपाई (compensation for damages) देण्याची शिक्षा सुनावली व रक्कम व्याजासह न दिल्यास अतिरिक्त चार महिने कारावासाची शिक्षा भोगण्याचे आदेश १२ मार्च रोजी दिलेले आहे.

हे देखील वाचा : कर्जत एमआयडीसीचा प्रश्न पुन्हा न्यायालयात

या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की

महेश सुमतिलाल संचेती आणि फिर्यादी विनायक दत्तात्रय भोकरे यांचे मैत्री पूर्ण संबंध होते. आरोपी अंजुश्री महेश संचेती आणि त्यांचे पती महेश सुमतिलाल संचेती यांचा जमीन खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्यामुळे आरोपी अंजुश्री महेश संचेती यांचे पती महेश सुमतिलाल संचेती यांनी जमीन खरेदी करण्याकरिता रुपये ७ लाख भोकरे यांच्याकडून काही महिन्यात परत करतो, या बोलीवर घेतले होते. मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे फिर्यादी रक्कम देण्यास तयार झाले. आरोपी यांचे पती यांनी घेतलेली रक्कम अंजुश्री महेश संचेती यांनी वेळेत परत करण्याची हमी घेतली होती. परंतु, संचेती यांना रक्कम परत मागितल्यावर त्यांनी रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली.

नक्की वाचा : नगरकरांवर पुन्हा जलसंकट; शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

फिर्यादीची जाणूनबुजून फसवणूक (Cheque Bounce)

तसेच अंजुश्री महेश संचेती यांनी भोकरे यांना स्वतःच्या खात्याचा रुपये अडीच लाखाचा धनादेश दिला. परंतु, हा धनादेश हा संचेती यांच्या खात्यात रक्कम शिल्लक नसल्याने न वटता परत आला. यामध्ये आरोपी यांनी फिर्यादीचा विश्वासघात करून जाणूनबुजून फसवणूक केलेली आहे. तसेच फिर्यादी भोकरे यांचे आर्थिक नुकसान केलेलं आहे. फिर्यादी यांच्या वतीने अ‍ॅड. अभिजीत अरविंद देशपांडे यांनी काम पहिले आहे. खटल्याच्या निकालामध्ये अ‍ॅड. देशपांडे यांचा युक्तिवाद महत्त्वपूर्ण धरण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here