Chess : नगरचा वेदांत पानसरे ठरला नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

Chess : नगरचा वेदांत पानसरे ठरला नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

0
Chess : नगरचा वेदांत पानसरे ठरला नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
Chess : नगरचा वेदांत पानसरे ठरला नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

Chess Tournament : नगर : अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ (Chess) संघटनेच्या वतीने नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) अखिल भारतीय खुली क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा (Chess Tournament) बडी साजन मंगल कार्यालय येथे पारितोषिक वितरण समारंभ (Prize distribution ceremony) झाला. नगरचा वेदांत पानसरे हा स्पर्धेचा विजेता ठरला.

अवश्य वाचा: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसमध्ये जाण्यावर बंदी नाही

दिग्गज खेळाडूंचा उत्कृष्ट खेळ

या स्पर्धेमध्ये २२ राज्यातून खेळाडू आले आहे. जे खेळाडू आजपर्यंत टाळ्या वाजवत आले त्या बुद्धिबळ खेळाडूंसाठी बिलो १६०० ही मानांकन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये ५५५ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला व अनेक धक्कादायक निकाल पहायला मिळाले. या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूंचा उत्कृष्ट खेळ नगरकरांना पाहायला मिळाला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उद्योजक आनंद चंगेडिया, विनय बोगावत, विप्र सालवा, आशिष जांगला, विजय भंडारी, विक्रम फिरोदिया, आशिष सारडा यांच्या हस्ते झाले. यावेळी अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत डांगे, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त पारुनाथ ढोकळे, श्याम कांबळे, मनीष जसवानी, देवेंद्र वैद्य, प्रकाश गुजराथी, चेतन कड, अनुराधा बापट, डॉ स्मिता वाघ, शुभदा ठोंबरे, रोहिणी आडकर, मुख्य पंच प्रवीण ठाकरे, पवन राठी, अनुपम भट्टाचार्य, शार्दुल तापसे, यशवंत पवार, अमरीश जोशी, रोहित आडकर, देवेंद्र ढोकळे आदींसह पालक खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते.

Chess : नगरचा वेदांत पानसरे ठरला नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
Chess : नगरचा वेदांत पानसरे ठरला नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

नक्की वाचा: ‘ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत’ – लक्ष्मण हाके

नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, (Chess Tournament)

अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना व शांतीकुमार जी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन हे बुद्धिबळ प्रचार व प्रसारासाठी कटिबद्ध आहे. बुद्धिबळाच्या इतिहासात ५५५ खेळाडू भारतातून आलेले आहेत. हे नगर मध्ये पहिल्यांदाच होत आहे. या स्पर्धाला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असून या स्पर्धेचे गिनीज बुकमध्ये नोंद देखील झालेली आहे. योगायोगाने इंटरनॅशनल चेस डे व गुरुपौर्णिमा असल्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.

स्पर्धेचे निकाल –
प्रमुख विजेता गट –

प्रथम- वेदांत पानसरे, द्वितीय- ऋषभ जठार, तृतीय- प्रिषा मरगज, चतुर्थ- आदित्य चिंचोलकर, पाचवा- राजवीर पाटील, सहावे- प्रसाद वांजळे, सातवे- एम गोपीनाथ, आठवे- अभिषेक मिश्रा, नववे- भारत आमले, दहावे- राहुल सोनी, अकरावे- सुरेश रावते, बारावे- सदानंद चोठे, तेरावे- हर्षवर्धन झांवर, चौदावे- ओम पाटील, पंधरावे- अनिल महादेव.

बेस्ट बिलो १५००.
प्रथम- निशांत करंदीकर, द्वितीय- अरीन कुलकर्णी, तृतीय- आर्यन चक्राबोर्टी, चतुर्थ- अरविंद प्रभाकर, पाचवा- अर्णव पवार,  सहावे- अंशूलकुमार रॉय, सातवे- चैतन्य पाटील,  आठवे- सुश्रुत ननल,  नववे- सिद्धार्थ परदेशी.

बिगर मानांकित विजेते:
प्रथम-आयान सोमानी, द्वितीय-मंदार साने, तृतीय-रोहन तमानेकर, चतुर्थ-हर्ष बडे, पाचवे-एस गोपीनाथन, सहावे-सार्थक प्रसाद, सातवे-रामकुमार राजपूत, आठवे-दीपक रिपल, नववे-ऋषी मिश्रा.

ज्येष्ठ खेळाडू:
प्रथम-ईश्वर रामटेके, द्वितीय-धीरेंदर दस, तृतीय-वाय एम श्यामकुवर, चतुर्थ-ओ पी तिवारी, पाचवे-राजाराम, सहावे-प्रमोद रामटेके, सातवे-वासवी गोवर्धन, आठवे-सुब्रमण्यम, नववे-संजय बोरकर.

महिला मधील विजेते.
प्रथम-साक्षी चव्हाण, द्वितीय-पल्लवी यादव, तृतीय-जिया शेख, चतुर्थ-तिरुपती प्रभू, पाचवे-मानसी टिळेकर, सहावे- सएकुरा जेनीका, सातवे-रीमा देशमुख, आठवे-भूमिका वाघले, नववे-शर्वरी कलुबरमे.

अहमदनगर मधील विजेते.
प्रथम-दर्श पोरवाल, द्वितीय-दीपक सुपेकर, तृतीय-शिवप्रसाद काळे, चतुर्थ-यश धाडगे, पाचवे- अनय महामुनी, सहावे-जिनम संकलेचा, सातवे-सुनील जोशी, आठवे- आदेश देखणे, नववे- अथर्व पाटील.

१५ वर्षांखालील विजेते.
प्रथम-अथर्व रेड्डी, द्वितीय- अभय चेट्टी, तृतीय- प्र्रणाम्या पणागावकर, चतुर्थ-अथर्व सावले, पाचवे- देवेश अंभोरे, सहावे-ध्रुव गांधी, सातवे- सोहम जथर, आठवे- गणगण विश्वनाथ, नववे-रेहान गोहेल.

१३ वर्षांखालील विजेते.
प्रथम- अमेय चौधरी, द्वितीय- सर्वेश कर्डे, तृतीय- कश्यप खाखारिया, चतुर्थ- कविष लिमये, पाचवे- ज्जिद निओ, सहावे- रायन मरचंत, सातवे- अभिलाषा यादव, आठवे- प्रिजेश वेलियाठुपरंबिल, नववे- अभिजय वालवेकर.

११ वर्षांखालील विजेते (उतेजनार्थ).
प्रथम- साम्यक कुलकर्णी, द्वितीय- ईशान अर्जुन, तृतीय- हित बलदेवा, चतुर्थ- सानवी गोरे, पाचवे- रियांश द्विवेदी.

९ वर्षांखालील विजेते.
प्रथम- विवन कासलीवाल, द्वितीय- परव हकानी, तृतीय- सर्वज्ञ बालगुडे, चतुर्थ-अंश काबरा, पाचवे- देवांश देकाते, सहावे- सूर्या भोंडवे, सातवे- वरद पाटील, आठवे- देवांश तोटला, नऊवे- मोक्ष राठी.

७ वर्षांखालील विजेते.
प्रथम- देवांश पाटील, द्वितीय- अन्वी हिंगे, तृतीय- शौर्य सोनवणे, चतुर्थ- देटीन लोबो, पाचवे- वीर अहुजा, सहावे- आर्यन ब्रह्मचारी, सातवे- काविष भट्टड, आठवे- आरव जाधव, नववे- अगस्त्य पटवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here