Chess Competition : अहिल्यानगर जिल्ह्यात बुद्धिबळ स्पर्धेमुळे जास्तीत जास्त ग्रँडमास्टर तयार होतील : नरेंद्र फिरोदिया

Chess Competition : अहिल्यानगर जिल्ह्यात बुद्धिबळ स्पर्धेमुळे जास्तीत जास्त ग्रँडमास्टर तयार होतील : नरेंद्र फिरोदिया

0
Chess Competition : अहिल्यानगर जिल्ह्यात बुद्धिबळ स्पर्धेमुळे जास्तीत जास्त ग्रँडमास्टर तयार होतील : नरेंद्र फिरोदिया
Chess Competition : अहिल्यानगर जिल्ह्यात बुद्धिबळ स्पर्धेमुळे जास्तीत जास्त ग्रँडमास्टर तयार होतील : नरेंद्र फिरोदिया

Chess Competition : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात बुद्धिबळ स्पर्धेमुळे (Chess Competition) जास्तीत जास्त ग्रँडमास्टर तयार होतील, असे प्रतिपादन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी केले. मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन नरेंद्र फिरोदिया व आंध्र प्रदेशचा (Andhra Pradesh) इंटरनॅशनल मास्टर कृष्णा तेजा (Krishna Teja) यांच्या हस्ते पटावर चाल देऊन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

नक्की वाचा : चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस सरकारचे १० मोठे निर्णय

खेळाडू, पालक मोठ्या संख्येने उपस्थित

यावेळी सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त श्याम कांबळे, पारुनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी, नवनीत कोठारी, दत्ता घाडगे, चेतन कड, किरण सरोदे, अनुराधा बापट, शुभदा ठोंबरे, डॉ. स्मिता वाघ, रोहिणी आडकर. आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे, पवन राणे, शार्दुल तापसे, देवेंद्र ढोकळे, प्रशांत  गंगेकर, विष्णू कुड्रे, स्वप्नील भुंगुरकर, सुनील जोशी, मनीष जसवानी आदीसह खेळाडू पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा : देवेंद्र फडणवीसांचा संतोष देशमुखांच्या लेकीला फोन; बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल केलं अभिनंदन

नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, (Chess Competition)

बुद्धिबळासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना कटिबद्ध राहील. लकरच राष्ट्रीय पंच परीक्षा, बीलो १ हजार ६०० बुद्धिबळ स्पर्धा असे नवनवीन उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे.

सचिव यशवंत बापट म्हणाले की, या स्पर्धेसाठी गुजरात, आंध्र प्रदेश, द्वि-दमन, गोवा, तमिळनाडू, महाराष्ट्र आदी राज्यातून ३०० च्या वर खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर नगर जिल्ह्यातील ७५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला असून या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त १७१ खेळाडू सहभागी झाले आहेत. वयोवृद्ध व ज्येष्ठ असे २० खेळाडू सहभागी झाले असून या स्पर्धेत फीडे मास्टर वेदांत पानेसर, अरुण कटारिया, कृष्णा तेजा, वीरेश शरणार्थी, विक्रमादित्य कुलकर्णी, राहुल संगमा, श्रीराज भोसले, इंद्रजीत महिंद्रकर, आदित्य बारटक्के, अथर्व सोनी, हर्ष घाडगे, आशिष चौधरी, शार्दुल अय्यप्पा यांच्या सहित अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहे.

दरम्यान, या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी जम्मू काश्मीर येथील पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना व माजी आमदार अरुण जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू व सर्वात ज्येष्ठ खेळाडू व सर्वात लहान वयाचा खेळाडूंचे सत्कार यावेळी करण्यात आले. तसेच स्पर्धेचे सूत्रसंचालन पारूनाथ ढोकळे यांनी केले तर सुबोध ठोंबरे यांनी आभार मानले.