Chess Tournament : मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत वेदांत पानेसर विजेता

Chess Tournament : मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत वेदांत पानेसर विजेता

0
Chess Tournament : मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत वेदांत पानेसर विजेता
Chess Tournament : मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत वेदांत पानेसर विजेता

Chess Tournament : नगर : ऑल इंडिया ओपन मोतीलालजी फिरोदिया अखिल भारतीय खुली क्लासिक बुद्धिबळ स्पर्धा (Chess Tournament) अहिल्यानगरच्या सप्तक सदन येथे रविवारी (ता. १३) झाली. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित व शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation) प्रायोजित बुद्धिबळ स्पर्धेचा बक्षीस समारंभ झाला. ७ ते ११ मे या कालावधीत ही ऐतिहासिक बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राचा वेदांत पानेसर विजेता तर गोव्याचा राहुल संगमा उपविजेता ठरला.

अवश्य वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्रोची एन्ट्री; पाकिस्तानच्या हालचालीवर इस्रोच्या १० उपग्रहांची नजर

प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व रोख रक्कम देऊन स्पर्धकांचा सन्मान

या स्पर्धेचे विजेत्यांना जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त श्याम कांबळे, पारुनाथ ढोकळे, प्रमुख पंच प्रवीण ठाकरे (जळगाव), शार्दुल टापसे (सांगली), पवन राठी (सोलापूर), शिशिर इंदुरकर ( नागपूर), देवेंद्र ढोकळे, प्रशांत घंगेकर, किरण सरोदे, प्रकाश गुजराथी,डॉ स्मिता वाघ,अनुराधा बापट, शुभधा ठोंबरे, रोहिणी आडकर आदीसह खेळाडू पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आदमपूर एअरबेसवर; जवानांशी साधला संवाद

जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, (Chess Tournament)

या स्पर्धेत जे सर्व विजेत्यांचे झाले आहेत त्यांचे अभिनंदन व जे पराभूत झाले आहेत त्यांनी दोन महिने चांगला सराव करून १८ जुलै रोजी होणाऱ्या बुद्धीबळ स्पर्धेत यशस्वी व्हावं असे आवाहन केले. अहिल्यानगर येथे खेळाडूं साठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात बुद्धिबळा खेळाची आवड निर्माण होऊन उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडू तयार होत आहेत व जिल्ह्याचे नाव मोठे करत आहेत. या स्पर्धेला महाराष्ट्र सह अनेक राज्यातील खेळाडू सहभागी होऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले या स्पर्धेत १७० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू सहभागी झाले होते.  ही या स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाबा असून त्यामुळे या स्पर्धेचा दर्जा उच्च स्तरावर पोहोचला आहे. जिल्ह्यातील अनेक बुद्धिबळ खेळाडू घडवण्यासाठी वेळोवेळी आम्ही नवनवीन उपक्रम राबवत असतो. बुद्धिबळ हा खेळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही लोकप्रिय झाला आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातुन या स्पर्धेत खेळाडू खेळण्यासाठी आले होते. मातृदिनाच्या शुभेच्छा त्यांनी सर्व सहभागी महिलांना दिल्या. व आपल्या मुलांसाठी सर्व माता जे कष्ट घेत आहे त्यांना वंदन केले.

या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे. खुला गट
प्रथम- वेदांत पानेसर, द्वितीय- राहुल संगमा, तृतीय- विरेश शरणार्थी, चतुर्थ- विक्रमादित्य कुलकर्णी, पाचवे- कृष्णा तेजा, सहावे-इंद्रजीत महिंद्रकर, सातवे- श्रीराज भोसले, आठवे- अर्णव कोळी, नववे- अरुण कटारिया, दहावे- शोनक बडोले, अकरावे- आदित्य बारटक्के, बारावे- अथर्व सोनी, तेरावे- चैतन्य गावकर, चौदावे- विराज राणे, पंधरावे- अपूर्व वाकचौरे.


बेस्ट रेटिग १७९९ ग्रुप:_
प्रथम- अपूर्व देशमुख, द्वितीय- आराध्य टिकम, तृतीय- उमेश आर्या, चतुर्थ- साहिल घोरगटे,  पाचवे- भुवन शितोळे, सहावे- प्रसाद खेडकर, सातवे- मारुती कोंडागुरळे, आठवे- युधार्थ नरोडे, नववे- हित बलदवा, दहावे- संयम विश्वेश, अकरावे- हरदन शहा, बारावे- मोहनकर रुतम, तेरावे- चैतन्य पाटील, चौदावे- विंहग चांगन, पंधरावे- यश राणे.


बेस्ट रेटिंग १५९९ ग्रुप:_
प्रथम- आदर्श पाटील, द्वितीय- अनिश रावते, तृतीय- जीनम संकलेचा, चतुर्थ- सतीश म्हस्के, पाचवे- ऋषिकेश लोहणकर, सहावे- सार्थक शिंदे, सातवे- ओम वैद्य, आठवे- सुनील जोशी.


बेस्ट अनरेटेड:_
 प्रथम- शौर्य भोंदवे, द्वितीय- राहुल ढवळे, तृतीय- स्वराज विश्वासे, चतुर्थ- देवांश तोतला, पाचवे- पार्श्व लिंगाडे, सहावे- प्रथमेश देवडेकर, सातवे- समर्थ भारस्कल, आठवे- श्रीहान करमकर.


बेस्ट 60  जेष्ठ खेळाडू:_
प्रथम- मिलिंद पारले, द्वितीय- दीपक ढेपे, तृतीय- ए.इ. सॅम्युअल, चतुर्थ- देवेंद्र चिंचाणी, पाचवे- सुरेंद्र सरदार, सहावे- ईश्वर रामटेके, सातवे- बलभीम कांबळे, आठवे- चंद्रकांत चौधरी.  


उत्कृष्ट महिला:_
प्रथम- त्रिशा मारगज, द्वितीय- भूमिका वागळे, तृतीय- तन्मई घाटे, चतुर्थ- शर्वी बाकलीवाल,  पाचवे- सई देव, सहावे- हिरणमयी कुलकर्णी, सातवे- दृश्य नाईक, आठवे- श्रावणी नानकर.


उत्कृष्ट अहिल्यानगर खेळाडू:_
प्रथम- आशिष चौधरी, द्वितीय- हर्ष घाडगे, तृतीय- आयुष वाघ, चतुर्थ- ऋषिकेश रानडे, पाचवे- स्वराज काळे, सहावे- दर्श पोरवाल, सातवे- श्रीराज इंगळे,  आठवे- ईशान चोरडिया.


उत्कृष्ट अहिल्यानगर तालुका:_
प्रथम- वरद जोशी, द्वितीय- समृद्धी कोटे, तृतीय- विराज मचे, चतुर्थ- वेदांत शिंदे, पाचवे- अन्वय जोशी.


उत्कृष्ट ११ वर्षाखालील:_
प्रथम- रियांश द्विवेदी, द्वितीय- वरद पाटील, तृतीय- नैतिक माने, चतुर्थ- तीर्थ कोदरे, पाचवे- श्रेयस नलावडे, सहावे- मोहन झडे, सातवे- मानस करणसे, आठवे- आराध्या देसाई.


उत्कृष्ट ९ वर्षाखालील:_
प्रथम- आदेन लासरदो, द्वितीय- अनिश जवळकर, तृतीय- जयदेव महडा, चतुर्थ- पृथ्वा ठोंबरे, पाचवे- अंश पटेल, सहावे- शर्वी भंगुरकर, सातवे- अन्वित गायकवाड, आठवे- रीवा चारणकर.


उत्कृष्ट ७ वर्षाखाली:_
प्रथम- कविष भट्टाड, द्वितीय- शिवांश श्रीगादी, तृतीय- मुगांक पाटील.