Chess Tournament : नगर : येत्या १८ ते २० जुलै २०२५ पर्यंत अहिल्यानगर च्या, लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, एसटी स्टँड रोड येथे दुसरी नरेंद्रजी फिरोदिया चषक (Narendraji Firodia Chashak) अखिल भारतीय सोळाशे पेक्षा कमी मानांकित खेळाडूंसाठी बुद्धिबळ स्पर्धा (Chess Tournament) आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाअध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी (Narendra Kulkarni) यांनी दिली.
नक्की वाचा : अहिल्यानगरच्या कृष्णराज टेमकर याची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड
संपूर्ण भारतातून खेळाडू चेस खेळण्यासाठी येणार
या स्पर्धेत भारतातून खेळाडू बुद्धिबळ खेळण्यासाठी येणार असून आत्तापर्यंत गुजरात, आंध्र प्रदेश, दिव, दमन, गोवा, तमिळनाडू, तेलंगाना इत्यादी राज्यातून तीनशे च्या वर खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तसेच गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधून वरील स्पर्धा आयोजित केली आहे. नरेंद्र फिरोदिया यांनी आजपर्यंत बुद्धिबळा साठी दिलेल्या योगदानाला वंदन म्हणून त्यांच्या नावाची ही दुसऱ्यांदा स्पर्धा आयोजित केली आहे, असे अहिल्यानगरनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले.
अवश्य वाचा : अभिमानास्पद!भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
१८ ते २० जुलै २०२५ पर्यंत चालणार स्पर्धा (Chess Tournament)
साडेचार वर्षाचा बाळ खेळाडू तसेच ८३ वर्षाचे वयस्कर खेळाडू सुद्धा यात आपले बुद्धीचे बळ पणाला लावणार आहेत. शुक्रवारी (ता. १८) सकाळी १० वाजता ह्या स्पर्धचे प्रारंभ होणार आहे. त्यानंतर स्पर्धा सुरू होणार आहे या स्पर्धेत एकूण ९ फेऱ्या होणार आहेत. रविवारी (ता. २०) दुपारी ४ वाजता अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
या स्पर्धेत विविध गटात पाच लाख रुपयांची प्रोत्साहन पर रोख बक्षिसे, आकर्षक ७० करंडक व सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेचे प्रमुख पंच प्रवीण ठाकरे (जळगाव) हे असून त्यांना शार्दुल टापसे (सातारा), पवन राठी (सांगली), शिशिर ( नागपूर), सनी गुगळे, प्रज्वल आव्हाड (नगर) आदी सहाय्यक पंच म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. ही स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या नियम नियमावली नुसार होणार आहे.
तसेच या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे १०० लाकडी पट व सोगट्या चा वापर होणार आहे. अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य सुबोध ठोंबरे, परूनाथ ढोकळे, शाम कांबळे, प्रशांत गंगेकर, देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर, मनीष जसवानी, प्रकाश गुजराती, चेतन कड, देवेंद्र वैदय, संजय खडके, नवनीत कोठारी, डॉ. स्मिता वाघ, रोहिणी आडकर आदी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अहिल्यानगर शहरातील खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वरील स्पर्धेत अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क यशवंत बापट.