Chess Tournament : ‘मोतीलालजी फिरोदिया’ आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा

Chess Tournament : 'मोतीलालजी फिरोदिया' आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा

0
Chess Tournament
Chess Tournament : 'मोतीलालजी फिरोदिया' आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धा

Chess Tournament : नगर : आनंदऋषी हॉस्पिटल शेजारी, बडी साजन मंगल कार्यालय येथे शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation) प्रायोजित अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा (Chess Tournament) आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ३ मे ते ७ मे राेजी हाेणार आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी दिली. 

हे देखील वाचा: नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार

भारतभरातून सहभागी होणार स्पर्धक (Chess Tournament)

या स्पर्धेत भारतातून खेळाडू बुद्धिबळ खेळण्यासाठी येणार आहे. आत्तापर्यंत गुजरात, आंध्र प्रदेश, दीवदमन, गोवा, तमिळनाडू आदी राज्यातून अडीचशेच्यावर खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी सहित अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, असे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. साडेपाच वर्षांचा बाळ खेळाडू तसेच ८३ वर्षाचे वयस्कर खेळाडू सुद्धा यात आपले बुद्धीचे बळ पणाला लावणार आहे, असे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले.शुक्रवारी ३ मे रोजी सकाळी ११.३० वाजता ह्या स्पर्धचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण ९ फेऱ्या होणार आहेत. शेवटी मंगळवारी दुपारी ३ वाजता अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

Chess Tournament
Chess Tournament

नक्की वाचा: ‘देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात तो सत्तेचा गैरवापर’-रोहित पवार

स्पर्धेसाठी अशी असणार व्यवस्था (Chess Tournament)

या स्पर्धेत विविध गटात तीन लाख रुपयांची प्रोत्साहन पर रोख बक्षिसे, आकर्षक ५० करंडक व  सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेचे प्रमुख पंच प्रवीण ठाकरे (जळगाव) हे असून त्यांना शार्दुल टापसे (सातारा) सहायक पंच म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. ह्या दोघांना ६ सहायक पंच मदत करणार आहेत. ही स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या नियम नियमावलीनुसार होणार आहे. तसेच या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे १०० लाकडी पट व सोगट्या चा वापर महाराष्ट्रात पहिल्यांदा होणार आहे. अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य सुबोध ठोंबरे, परूनाथ ढोकळे, शाम कांबळे, देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर, मनीष जस्वनी, प्रकाश गुजराती, चेतन कड, देवेंद्र वैद्य, संजय खडके, नवनीत कोठारी, डॉ. स्मिता वाघ आदी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अहमदनगर शहरातील खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Chess Tournament
Chess Tournament

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here