Chess tournament : नगर : नगरमध्ये आनंदऋषी हाॅस्पिटल शेजारी, बडी साजन मंगल कार्यालय येथे नरेंद्रजी फिराेदिया (Narendra Firodia) अखिल भारतीय (All India) खुली बुद्धिबळ स्पर्धा (Chess tournament) आयाेजित करण्यात आली आहे. ही बुद्धिबळ स्पर्धा १९ ते २१ जुलैदरम्यान पार पडणार आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी दिली.
नक्की वाचा: मोहरम सणानिमित्त हे रस्ते राहणार ‘नो व्हेईकल झोन
बुद्धिबळासाठी दिलेल्या योगदानाला वंदन
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तसेच गुरुपौर्णिमा याचे औचित्य साधून आम्ही वरील स्पर्धा आयोजित केली आहे. ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांनी आजपर्यंत बुद्धिबळासाठी दिलेल्या योगदानाला वंदन म्हणून आम्ही त्यांच्या नावाची स्पर्धा आयोजित केली आहे, असे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले.
अवश्य वाचा: आषाढीसाठी पंढरपूर प्रशासन अलर्ट मोडवर;चंद्रभागेच्या तिरी वारकऱ्यांची गर्दी
देशभरातील खेळाडू बुद्धिबळ खेळण्यासाठी येणार (Chess tournament)
या स्पर्धेत देशभरातील खेळाडू बुद्धिबळ खेळण्यासाठी येणार आहे. आत्तापर्यंत गुजरात, आंध्र प्रदेश, दीव-दमण, गोवा, तमिळनाडू, काश्मीर आदी राज्यातून चारशेच्यावर खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. या स्पर्धेत साडेपाच वर्षाचा बाळ खेळाडूपासून ८३ वर्षांचे वयस्कर खेळाडू सुद्धा यात आपले बुद्धीचे बळ पणाला लावणार आहेत. शुक्रवारी (ता. १९) रोजी सकाळी १०.०० वाजता ह्या स्पर्धचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण ९ फेऱ्या होणार आहेत. रविवारी (ता. २१) दुपारी ५.०० अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेत विविध गटात ३ लाख रुपयांची प्रोत्साहन पर रोख बक्षिसे, आकर्षक ५० करंडक व सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेचे प्रमुख पंच प्रवीण ठाकरे (जळगाव) हे आहे. त्यांना शार्दुल टापसे (सातारा), यशवंत पवार (कल्याण), वैभव कुंभालकर (गोंदिया) सहायक पंच म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. या चौघांना ६ सहायक पंच मदत करणार आहेत. ही स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या नियम नियमावली नुसार होणार आहे. तसेच या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे १०० लाकडी पट व सोगट्याचा वापर होणार आहे. अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य सुबोध ठोंबरे, पारूनाथ ढोकळे, श्याम कांबळे, देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर, मनीष जसवानी, प्रकाश गुजराती, चेतन कड, देवेंद्र वैद्य, संजय खडके, नवनीत कोठारी, डॉ. स्मिता वाघ आदी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अहमदनगर शहरातील खेळाडूंनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.