Chess Tournament : नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन; ५६० खेळाडूंचा सहभाग

Chess Tournament : नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन; ५६० खेळाडूंचा सहभाग

0
Chess Tournament : नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन; ५६० खेळाडूंचा सहभाग
Chess Tournament : नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन; ५६० खेळाडूंचा सहभाग

Chess Tournament : नगर : अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे नरेंद्रजी फिरोदिया (Narendra Firodia) अखिल भारतीय (All India) खुली क्लासिकल आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे (Chess Tournament) आयाेजन केले आहे. ही स्पर्धा आनंदऋषी हॉस्पिटल शेजारी, बडी साजन मंगल कार्यालय येथे हाेत आहे. या स्पर्धेचा प्रारंभ अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रजी फिरोदिया यांच्या उपस्थितीत पटावर चाल देऊन करण्यात आला.

नक्की वाचा: ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’;शरद पवारांचे सूचक विधान

यांची उपस्थिती (Chess Tournament)

यावेळी सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त शाम कांबळे, पारुनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी, संजय खडके, सुनील जोशी, दत्ता घाडगे, स्वप्निल भगूरकर, ओंकार बापट, चेतन कड, अनुराधा बापट, डॉ. स्मिता वाघ, शुभदा ठोंबरे, रोहिणी आडकर, पंच म्हणून प्रवीण ठाकरे, शार्दुल तापसे, यशवंत पवार, अनुपम भट्टाचार्य, अमरीश जोशी, निळकंठ श्रावण, पवन राठी, गायत्री कुलकर्णी,  वैभव कुंभलकर, देवेंद्र ढोकळे, देवेंद्र वैद्य, रोहित आडकर आदी उपस्थित हाेते. 

अवश्य वाचा: निवडणुकीत तर हरवलं आता काेर्टातही तेच हाेईल; लंकेंची नाव न घेता विखेंवर टीका

यशवंत बापट म्हणाले, (Chess Tournament)

”या स्पर्धेत भारतातून खेळाडू बुद्धिबळ खेळण्यासाठी आले आहे. आत्तापर्यंत गुजरात, आंध्र प्रदेश, दीव-दमन, गोवा, तमिळनाडू, काश्मीर, उत्तर प्रदेश, अंदमान, निकोबार आदी राज्यातून ५६० च्या वर खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस व गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून या स्पर्धाचे आयोजन केले आहे. नरेंद्र फिरोदिया यांनी आजपर्यंत बुद्धिबळासाठी दिलेल्या योगदानाला वंदन म्हणून त्यांच्या नावाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.”


अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व सचिव यशवंत बापट यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नरेंद्र फिराेदिया म्हणाले, ”माझ्या नावाची स्पर्धा ही खरोखर माझ्यासाठी अभिमानाची गाेष्ट आहे. नगरच्या इतिहासात ५६० खेळाडू भारतातून आलेले आहे. पहिल्यांदाच होत असलेली ही स्पर्धेत इतका मोठा प्रतिसाद लाभला आहे. योगायोगाने चेस डे व गुरुपौर्णिमा असल्याने हे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेतर्फे काहीतरी अहमदनगर शहरांमध्ये वेगळं झालं पाहिजे. या हेतूने बुद्धिबळ खेळाडूंसाठी बिलो १६०० च्या खेळाडूंनी इतर स्पर्धेत फक्त टाळ्या का वाजवावे त्यांना सुद्धा बक्षीस मिळाले पाहिजे. या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर शहरात बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून दोन स्पर्धा होत, आता नवीन उपक्रम म्हणून ही तिसरी स्पर्धा खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली आहे. खेळाडू कसे वाढावे, या हेतूने हे उपक्रम राबवत असून पुढचे ग्रँडमास्टर अहमदनगर शहरातूनच होतील. या स्पर्धेसाठी शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनने माेलाचे सहकार्य केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here