Chess tournament : नगर : नगरच्या देवेंद्र वैद्यची (Devendra Vaidya) आशियाई बुद्धिबळ स्पर्धेसाठी (Chess tournament) निवड झाली आहे. याबद्दल देवेंद्र वैद्यचा अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नक्की वाचा: श्रीरामपूर खून प्रकरणात दोन आरोपी १२ तासांत गजाआड
सर्वतोपरी मदत करण्यात येणार
या प्रसंगी नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले की, देवेंद्र वैद्य हा भारताचा कर्णधार व नुकताच रशिया येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धा खेळून आला आहे. नगर जिल्ह्याचा आघाडीचा बुद्धिबळ खेळाडू देवेंद्र वैद्यच्या पाठीमागे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना तसेच शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन हे खंबीरपणे उभे राहील. त्याला सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अवश्य वाचा : मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया
सत्काराला उत्तर देताना देवेंद्र वैद्य यांनी सांगितले की (Chess tournament)
या सत्कारामुळे मला नवीन ऊर्जा मिळाली आहे. मी इराण येथे होणाऱ्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करून दाखवीन. या सत्कार समारंभ प्रसंगी जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, विश्वस्त पारुनाथ ढोकळे, सुनील गुगळे, अजय गांधी व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
ऑल इंडिया स्पोर्ट कौन्सिल ऑफ दी डेफ यांचा तर्फे मध्य प्रदेश (इंदोर) येथे २७ ते २८ जुलै या कालावधीत राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत देवेंद्र वैद्यने प्रथम क्रमांक मिळवला. तो भारताचे प्रतिनिधित्व आशिया क्रीडा स्पर्धेत करणार आहे. आशियाई क्रीडा बुद्धिबळ स्पर्धा तेहरान (इराण) येथे १५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत होईल.