Chess tournament : १३ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

Chess tournament : १३ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

0
Chess tournament : १३ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन
Chess tournament : १३ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन

Chess tournament : नगर : अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे (Ahmednagar District Chess Association) १३वर्षांखालील खेळाडूंसाठी (Player) जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे (Chess tournament) आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी (ता. १५) सकाळी १० वाजता जुना कापड बाजार येथील नागर महाजन वाडी कार्यालय येथे होणार आहे.

नक्की वाचा: आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार

प्रथम २ खेळाडू राज्यस्तरावर पाठविण्यात येणार

पुणे येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी नगर जिल्ह्यातील मुलांचा व मुलींचा संघ या स्पर्धेतून निवडण्यात येणार आहे. अंतिम निकाल पत्रका प्रमाणे २ मुले व २ मुली, म्हणजेच प्रथम २ खेळाडू राज्यस्तरावर पाठविण्यात येतील. नगर जिल्ह्यातून निवड झालेल्या खेळाडूंची राज्य निवड चाचणी स्पर्धेची प्रवेश शुल्क एक हजार रुपये संघटनेमार्फत भरले जाईल व तेथे राहण्याची व्यवस्था सुद्धा केली जाईल. पहिल्या दोन खेळाडूंना (मुले व मुली) आकर्षक करंडक सुद्धा देऊन गौरविण्यात येणार आहे. ७ वर्षांखालील खेळाडूंना पाच पदके व ९ वर्षांखालील खेळाडूंना पाच पदके देण्यात येणार आहेत.

अवश्य वाचा: येथील मुस्लिम कुटुंबांकडून केली जाते गौराईची स्थापना

खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन (Chess tournament)

या स्पर्धेत १३वर्षां खालील मुले व मुली खेळाडूंसाठी खुली आहे. खेळाडूंनी येताना बुद्धिबळ पट, सोंगट्या, जेवणाचा डबा व पिण्याचे पाणी आणावे. सर्व सहभागी खेळाडूंनी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रवेश ऑनलाईन अथवा व्हॉट्सॲपवर स्वीकारला जाणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रयत्नशील असून अहमदनगर जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी उत्स्फुर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी केले आहे.


स्पर्धेतील प्रवेश नोंदणी व अधिक माहितीसाठी जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांच्याशी संपर्क साधावा, असे अवाहन अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने केले आहे.