Chess Tournament पाथर्डी : खेळात जय आणि पराजय असून स्पर्धकांनी त्यातून नवं शिकायचं असतं. बुद्धिबळ (Chess) स्पर्धेचे आयोजन उल्लेखनीय बाब आहे. भविष्यात आनंद अकॅडमीतून आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर बुद्धिबळ स्पर्धेत (Chess Tournament) मानांकन मिळवणारे स्पर्धक घडावेत असे प्रतिपादन श्री तीलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीष गुगळे यांनी यावेळी व्यक्त केले.
नक्की वाचा: मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेला स्थगिती,नवे अर्ज स्वीकारणे झालं बंद
विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
पाथर्डी येथील श्री तिलोक जैन विद्यालयात श्री तीलोक ज्ञान प्रसारक मंडळ व आनंद अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर, नगर या जिल्ह्यातील विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडरे, संस्थेचे विश्वस्त सुरेश कुचेरिया, चंपालाल गांधी, चांदमल देसरडा, संपतलाल गांधी, डॉ अभय भंडारी, प्राचार्य अशोक दौंड, परवेक्षक अजय भंडारी, विभाग प्रमुख सुधाकर सातपुते, बुद्धिबळ संघटनेचे यशवंत बापट आदी उपस्थिती होती.
अवश्य वाचा: ‘आम्ही राज ठाकरे यांचे भोंगे उतरवू’-सुजात आंबेडकर
गुगळे म्हणाले की, (Chess Tournament)
विविध स्पर्धेच्या माध्यमातून श्रीतिलोक जैन विद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास घडवत आहे. हि परंपरा अखंडपणे सुरू आहे. विद्यार्थ्यांना विविध खेळामध्ये व्यासपीठ म्हणून पुढे घेऊन जाण्यासाठी संस्था नेहमी खेळाडूंच्या पाठीमागे असेल असा विश्वास शेवटी गुगळे यांनी व्यक्त केला.
प्रियंका खिंडरे म्हणाल्या की,
बुद्धिबळ स्पर्धाही आपल्या एकाग्रतेवर अवलंबून असते. या खेळात तुमच्याकडे कमी वेळात एखादा डाव चतुराईने खेळून पुढच्या स्पर्धकाला कशी मात देता येईल त्यासाठी तुमच्याकडे बुद्धीचा उपयोग यामध्ये प्रामुख्याने आहे. सध्याच्या युगात बुद्धिबळ खेळ अत्यंत आपली बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळवणारे तब्बल ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेत पुणे, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यातून १०५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत पंच म्हणून यशवंत बापट यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडाशिक्षक अजय शिरसाट, अतिष भावसार, सागर नलावडे, जब्बार पठाण यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य अशोक दौंड, सूत्रसंचालन विवेक सातपुते यांनी करून आभार अजय भंडारे यांनी मानले.चे आयोजन उल्लेखनीय बाब आहे. भविष्यात आनंद अकॅडमीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ स्पर्धेत मानांकन मिळवणारे स्पर्धक घडावेत असे प्रतिपादन श्री तीलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीष गुगळे यांनी यावेळी व्यक्त केले.