Chess tournament : नगर : शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन (Shantikumarji Firodia Memorial Foundation) प्रायोजित व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा (Chess tournament) बुधवारी (ता. ६) ते रविवारी (ता. १०) या कालावधीत अहिल्यानगरमधील खिस्त गल्लीत असलेल्या सप्तक सदनमध्ये होणार आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी दिली.
अवश्य वाचा: “६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी, मी आणि उद्धव ठाकरे प्रचार सुरु करतोय” : शरद पवार
दोनशेच्या वर खेळाडूंचा प्रवेश निश्चित
या स्पर्धेत भारतातून खेळाडू बुद्धिबळ खेळण्यासाठी येणार असून आत्तापर्यंत गुजरात, आंध्र प्रदेश, दिव, दमन, गोवा, तमिळनाडू आदी राज्यातून दोनशेच्या वर खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. इंटरनॅनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी सह अनेक दिग्ज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, असे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
८३ वर्षांच्या खेळाडूचा सहभाग (Chess tournamen)
साडेपाच वर्षांचा सर्वात बाल खेळाडू तसेच ८३ वर्षांचे वयस्कर खेळाडू सुद्धा यात आपले बुद्धीचे बळ पणाला लावणार आहेत, असे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले. बुधवारी (ता. ६) सकाळी ११.३० वाजता ही स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण ९ फेऱ्या होणार आहेत. शेवटी रविवारी दुपारी दोन वाजता अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेत पंच शार्दुल तापसे (सांगली), अमरीश जोशी (संभाजी नगर), पवन राठी (पुणे) आदींना ४ सहाय्यक पंच सुद्धा मदत करणार आहेत.
अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य सुबोध ठोंबरे, परूनाथ ढोकळे, शाम कांबळे, देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर, मनीष जस्वनी,चेतन कड, प्रकाश गुजराती, नवनीत कोठारी आदी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अहमदनगर शहरातील खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वरील स्पर्धेत अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी यशवंत बापट व पारूनाथ ढोकळे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.