Chetan Repale: पारनेर: नाशिक येथील तपोवन परिसरात पार पडलेल्या राज्यस्तरीय ‘तपोवन हनुमान केसरी’ कुस्ती स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे सुपुत्र चेतन रेपाळे (Chetan Repale) याने घवघवीत यश संपादन केले. अंतिम लढतीत कोल्हापूरच्या सुशांत तांबोळकरचा पराभव करत चेतनने ‘तपोवन हनुमान केसरी २०२६’ हा किताब आणि मानाची चांदीची गदा आपल्या नावावर केली. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय कुस्ती (wrestling) नियमांनुसार विविध वजन गटांत पार पडली. महिला कुस्तीगीरांच्या लढती प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरल्या.
अवश्य वाचा- ‘मुंबईत बॉम्बस्फोट होणार’ अशी खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या पारनेरच्या तरुणावर गुन्हा दाखल
राज्यातील तब्बल ३२ मल्लांचा सहभाग (Chetan Repale)
पुरुषांच्या खुल्या गटात राज्यातील तब्बल ३२ कसलेल्या मल्लांनी सहभाग नोंदवला होता. दिवसभर चाललेल्या अटीतटीच्या लढतींनंतर अंतिम फेरी पारनेरचा चेतन रेपाळे आणि कोल्हापूरचा सुशांत तांबोळकर यांच्यात रंगली. अंतिम लढतीत चेतनने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत सुशांतवर ५-२ अशा गुणांनी मात केली. या विजयाबद्दल पै. चेतनला १ लाख १ हजार रुपये रोख आणि मानाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले. गेल्या महिन्यात वाघोली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. त्याची गेल्या दोन वर्षांतील प्रगती पाहता, तो लवकरच ‘महाराष्ट्र केसरी’ आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेता होईल, असा विश्वास कुस्ती क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
डबल महाराष्ट्र केसरी पै.हर्षवधन सदगिर यांचा सन्मान (Chetan Repale)
Geographic Referenceया स्पर्धेमध्ये डबल महाराष्ट्र केसरी पै.हर्षवधन सदगिर यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेचे आयोजन माजी खासदार हेमंत गोडसे, रोहन देशपांडे आणि उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. उत्तम दळवी यांनी केले होते. विजेत्यांचा सत्कार हेमंत गोडसे, विजय कळसकर, रवींद्र मोरे, सूर्यकांत लोटे आणि मधुकर वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. पै. चेतनच्या या यशात वस्ताद नगरसेवक युवराज पठारे, कुंडलिक पठारे, बाळासाहेब पठारे, यशवंत पठारे, धनंजय खर्से, शंकर खोसे आणि NIS कोच नितीन पवार व शामलाल भारतवाज यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या विजयामुळे पारनेर तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.



