Chhaava : अहिल्यानगर : सिनेमागृहामध्ये (Cinema Theaters) गेल्या महिनाभरापासून ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारलेला छावा हा चित्रपट (Movie) बॉक्स ऑफिसवर रोज कमाईचे नवनवे विक्रम मोडत आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची घोडदौड अजूनही चालूच आहे. महिनाभराच्या कालावधीपासून हा चित्रपट सिनेमागृहात चालू आहे. या सिनेमाने कमाईचा ५०० कोटींचा आकडा पार केला आहे.
नक्की वाचा : दुध दरात दोन रुपयांनी वाढ;’या’दिवशीपासून लागू होणार नवे दर
आतापर्यंत केली इतकी कमाई
छावा चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात २२५.२८ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने १८६.१८ कोटींची कमाई केली. तर प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने ८४.९४ कोटी रुपये कमवले. चौथ्या आठवड्यात ‘छावा’ चित्रपटाने ३६.५९ कोटी रुपये कमवले. प्रदर्शनाच्या २५ व्या दिवशी या चित्रपटाने ६ कोटी रुपये कमवले. तर २६ व्या दिवशी ५.२५ कोटी आणि २७ व्या दिवशी ५.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
अवश्य वाचा : अक्षर पटेल आता दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार!
ॲनिमल चित्रपटाला टाकलं मागे (Chhaava)
छावा या चित्रपटाने प्रदर्शनाच्या २८ व्या दिवशी ४.३५ कोटी रुपये कमवले आहेत. या कमाईसह छावा चित्रपटाच्या कमाईचा आकडा ५५४.१६ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. या चित्रपटाने आता कमाईच्या बाबतीत ‘ॲनिमल’ या चित्रपटालादेखील मागं टाकलं आहे. २०२३ साली प्रदर्शित झालेल्या ॲनिमल या चित्रपटाने एकूण ५५३.८७ कोटी रुपयांची कमाई केली होती.