Chhabi Movie:फोटो आणि कॅमेऱ्यामागील नाट्य आता रूपेरी पडद्यावर;छबी ‘या’दिवशी प्रदर्शित होणार 

0
Chhabi Movie:फोटो आणि कॅमेऱ्यामागील नाट्य आता रूपेरी पडद्यावर;छबी 'या'दिवशी प्रदर्शित होणार 
Chhabi Movie:फोटो आणि कॅमेऱ्यामागील नाट्य आता रूपेरी पडद्यावर;छबी 'या'दिवशी प्रदर्शित होणार 

नगर : प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते.तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफर्सची रंजक गोष्ट ‘छबी'(Chhabi Movie) या चित्रपटातून उलगडणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च (Poster Launch) करण्यात आले आहे.

नक्की वाचा : ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक आला समोर   

चित्रपटात कोण कोण झळकणार? (Chhabi Movie)

केके फिल्म्स क्रिएशन, उप्स डिजिटल एंटरटेन्मेेंट यांनी छबी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जया तलक्षी छेडा या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांच असून त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. ‘छबी’ या चित्रपटात ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश कदम, अपूर्वा कवडे  या नव्या दमाच्या कलाकारांसह अभिनेता समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, अभिनेत्री शुभांगी गोखले, राजन भिसे, जयवंत वाडकर,संकेत मोरे, संजय कुलकर्णी, लीना पंडित असे अनुभवी कलाकार आहेत. त्यामुळे चित्रपटाची अभिनयाची बाजू खणखणीत आहे.

अवश्य वाचा : आता गृहकर्ज,वाहनकर्ज स्वस्त होणार;पाच वर्षानंतर आरबीआयकडून व्याजदरात कपात  

चित्रपटाची कथा नेमकी काय ? (Chhabi Movie)

कोकणातील गावात फोटोग्राफर असलेल्या फोटोग्राफरची एक रंजक कथा ‘छबी’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यावर नक्कीच यामध्ये सस्पेन्स,थ्रिलर,रोमांस अनुभवता येणार असल्याचा प्राथमिक अंदाज बांधता येतो. ‘प्रत्येक छबीत एक गोष्ट असते’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यामुळे फोटो आणि कॅमेऱ्यामागील नाट्य आता पडद्यावर उलगडणार आहे. नव्या-जुन्या कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी असलेला, नावीन्यपूर्ण गोष्ट असलेला “छबी” चित्रपट पाहण्यासाठी २५ एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here