नगर : ओबीसीबाबत भूमिका मांडायची असेल तर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्रीपदाचा राजीनामा (Resignation) दिला पाहिजे. अन्यथा त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे, असं विधान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी केलं. यावर छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्या नेत्याचा ‘राजीनामा द्या’ असा एक मेसेज आला, तर मी एक क्षणही थांबणार नाही, असं मोठं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं. ते कर्जत येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
नक्की वाचा : विवेक कोल्हेंच्या प्रयत्नामुळे शिर्डी एमआयडीसीचा मार्ग मोकळा
विखे पाटलांच्या विधानाबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “मला आमदारकी किंवा मंत्रिपदाचं काहीही अप्रुप नाहीये. मी मागील ३५ वर्षांपासून ओबीसींचं काम करत आहे. ते काम मी सोडणार नाही. जे माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, त्यांना मी सांगितलं आहे की, तुमच्या नेत्याचा ‘राजीनामा द्या’ असा एक मेसेज आला, तर मी एक क्षणही थांबणार नाही.”
हेही वाचा : आजपासून एलपीजी गॅस महागला !
महाराष्ट्राचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावा, त्यांचा ओबीसींमध्ये समावेश करू नये, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. भुजबळांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.