Chhagan Bhujbal : नगर : गेल्या काही दिवसांपासून अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) येथील आंदाेलनस्थळावरून काेणीतरी मंत्री छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) माहिती पुरवत आहे, असा दावा मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. त्यामुळे आंदाेलनस्थळी एकच चर्चा रंगली आहे.
हे देखील वाचा: २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको; मराठा आंदोलनाची पुढची दिशा
मनोज जरांगे म्हणाले,
”येवल्याच्या नेत्यानेच त्याला पाठवलंय. पण मी त्या गद्दाराला सांगेन की, मराठ्यांशी बेईमानी करू नको. मी आत्ता जे काही बोलतोय ते तो गद्दार ऐकतोय. रोज आमच्याबरोबर उठतो-बसतो त्यामुळे त्याला समाजात प्रतिष्ठा मिळाली आहे. मी त्या गद्दाराला सांगेन की तू त्याला (छगन भुजबळ) काही सांगू नको. तो काही तुझा पणजोबा नाही.
नक्की वाचा : ‘मनोज जरांगे हे रोज खोटं बोलतात, रोज पलटी मारतात’- अजय महाराज बारस्कर
जातीशी गद्दारी करू नको (Chhagan Bhujbal)
इथे आंदोलनासाठी बसलेला आंदोलक आपला बाप आहे, त्याच्यासाठी काहीतरी कर. जातीशी गद्दारी करू नको.” मनोज जरांगे छगन भुजबळांचं नाव न घेता म्हणाले. ”मी माझ्या गोधडीत काय करतो त्याच्या चौकशा तू करू नको. माझ्या गोधडीत घुसू नको. साल्हेरच्या किल्ल्यावर तू कुठला कार्यकर्ता पाठवला होता, ते मला माहिती आहे. तिथे गर्दीत टेम्पो कसा घुसला, तेही मला माहिती आहे. लवकरच मी यावर जाहीरपणे बोलेन, हे ध्यानात असू द्या.