Chhagan Bhujbal : सगळ्या लोकांना मनोज जरांगे शिव्या देत आहेत, त्यांचं शिक्षण नाही; छगन भुजबळ यांचं वक्तव्य

0
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : नगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) ते शिव्या देत आहेत. उपमुख्यमंत्र्यांना (Deputy Chief Minister) शिव्या देत आहेत. सगळ्या लोकांना मनोज जरांगे शिव्या देत आहेत. त्यांचं शिक्षण नाही, त्यांचा काही अभ्यास नाही तरीही ते बडबड करत आहेत. आता बघू काय होतं? असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे.

मराठा आंदोलनामुळे संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

छगन भुजबळ म्हणाले की… (Chhagan Bhujbal)


मनोज जरांगेंचे सहकारीच त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे आता त्या सगळ्याचीही चौकशी झाली पाहिजे म्हणजे नेमकं जरांगेच्या मागे कोण आहे ते लक्षात येईल असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. जे लोक कायदा हातात घेतील त्यांच्याविरोधात कारवाई केली पाहिजे हे पोलिसांचं काम आहे. आपण आता सागर बंगल्यावरच जातो आहोत असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच ते सागर बंगल्याच्या दिशेने रवानाही झाले होते. अंबड या ठिकाणी संचारबंदी लागू केल्यानंतर ते माघारी परतले आहेत.

आशा सेविकांच्या मागण्यांसाठी विजय वडेट्टीवार आक्रमक

सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न हा आरोपच हास्यास्पद (Chhagan Bhujbal)

तसेच मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता या आरोपावर बोलतांना भुजबळ म्हणाले की हा आरोपच हास्यास्पद आहे, याला मी काय उत्तर देणार. मला जरांगेवर प्रश्न विचारु नका. काही नाटकांचं स्क्रिप्ट लिहिण्याची सुरुवात झाली आहे. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाच्या धर्तीवर मी जेव्हा होम डिपार्टमेंटला जाग येतेचं स्क्रिप्ट लिहितो आहे. तर दुसरं नाटक सीमेवरुन परत जा. या दोन नाटकांची स्क्रिप्ट लिहितो आहे. असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते मनोज जरांगे?
“माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. यामागे देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर राज्यात काहीच होऊ शकत नाही. जो माणूस स्वत:चा पक्ष कधीच सोडू शकत नाही, अशा लोकांवर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली. एकनाथ खडसे यांच्यावर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली. विनोद तावडे महाराष्ट्रातून कधीच बाहेर जाणार नव्हते. मात्र त्यांना दिल्लीला जावे लागले. नाना पटोले यांनादेखील फडणवीसांमुळे भाजपा सोडून जावे लागले. पंकजा मुंडे आयुष्यातही भाजपा सोडण्याचा विचार करू शकत नाहीत. मात्र भाजपात त्यांची घुसमट होत आहे. फडणवीस हे महादेव जानकर यांना धनगरांचा नेता म्हणून मोठं होऊ देत नाहीयेत,” असे जरांगे म्हणाले होते. यानंतर आता मनोज जरांगेंच्या मागण्या मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत आहेत अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here