Chhagan Bhujbal:नाराजीनाट्यानंतर छगन भुजबळ शिर्डीत दाखल

0
Chhagan Bhujbal:नाराजीनाट्यानंतर छगन भुजबळ शिर्डीत दाखल
Chhagan Bhujbal:नाराजीनाट्यानंतर छगन भुजबळ शिर्डीत दाखल

नगर : राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचे दोन दिवसीय शिबिर शिर्डी (Shirdi Camp) येथे पार पडत आहे. आज या शिबिराचा पहिला दिवस आहे. नाराजीनाट्यानंतर माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शिबिराला हजेरी लावली आहे. या नवं संकल्प शिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची मोर्चेबांधणी पार पडणार आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते ध्वजारोहण करून या अधिवेशनाची सुरूवात झाली आहे.

नक्की वाचा : इस्रोचं स्पेडेक्स मिशन यशस्वी;अंतराळात डॉकिंग करणारा चौथा देश ठरला भारत   

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शिर्डीत शिबीर (Chhagan Bhujbal)

आगामी महापालिका,नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच नेते तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन शिर्डीत पार पडले. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आजपासून दोन दिवस नवसंकल्प अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. शिर्डीत हे अधिवेशन पार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत या अधिवेशनात विचारमंथन केले जाणार आहे. या शिबिराला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे, हसन मुश्रीफ, अमोल मिटकरी, सयाजी शिंदे, किरण लहामटे, काशिनाथ दाते यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली आहे. 

राष्ट्रवादीचे नवसंकल्प अधिवेशन ज्या ठिकाणी होणार आहे त्या अधिवेशनाच्या ठिकाणास यशवंतराव चव्हाण नगरी म्हणून संबोधित करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत ठिकठिकाणी बँनर आणि पक्षाचे झेंडे पाहायला मिळत आहेत.

अवश्य वाचा : मोठी बातमी!अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला  

छगन भुजबळ यांची नाराजी दूर (Chhagan Bhujbal)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील,अशी चर्चा रंगली होती. यानंतर मोठे नाराजी नाट्यही पाहायला मिळाले. मात्र आता छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीवरुन आज ते शिबिराला उपस्थित असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here