Chhagan Bhujbal:’मनोज जरांगेंचा अभ्यास कमी,मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण’- छगन भूजबळ 

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी जरांगे करत आहेत, त्यांचा अभ्यास कमी आहे. त्यांना म्हणावं आधी अभ्यास करा. मुस्लिम समाजाला २५ वर्षापूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे. कधी मुस्लिमांना तर कधी धनगर समाजाला खुश करण्यासाठी ते मागण्या करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

0
Chhagan Bhujbal:'मनोज जरांगेंचा अभ्यास कमी,मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण'- छगन भूजबळ 
Chhagan Bhujbal:'मनोज जरांगेंचा अभ्यास कमी,मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण'- छगन भूजबळ 

नगर : मनोज जरांगेंचा अभ्यास कमी आहे. त्यांनी आधी अभ्यास करावा. मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) दिले आहे, अशी टीका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर केली आहे. नाशिक येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्यात काही ठिकाणी मुस्लीम समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे.

नक्की वाचा : राज्यात सलग दोन दिवस दमदार पावसाची शक्यता

‘कधी मुस्लिम तर कधी धनगर समाजाला खुश करण्यासाठी जरांगे मागणी करतात’ (Chhagan Bhujbal)

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी जरांगे करत आहेत, त्यांचा अभ्यास कमी आहे. त्यांना म्हणावं आधी अभ्यास करा. मुस्लिम समाजाला २५ वर्षापूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिले आहे. कधी मुस्लिमांना तर कधी धनगर समाजाला खुश करण्यासाठी ते मागण्या करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी मिळणार असल्याची चर्चा आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले की, निधी वाटपचे दान काय अजून मिळालेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे सर्व कामे राज्यभरात बंद होती. आता शिक्षक निवडणुकीमुळे पुन्हा आचारसंहिता सुरू आहे. म्हणून कामे रखडली आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

अवश्य वाचा : महाविकास आघाडी सर्वाधिक जागा जिंकणार, नीलेश लंके यांचा विश्‍वास; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे घेतले आशिर्वाद

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महिला मतदारांना नथ आणि पुरुष मतदारांना कपडे वाटत असल्याचा दावा शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केला. यावर छगन भुजबळ म्हणाले की, शिक्षकांना नथ, पैठणी वाटप होते हे वर्तमानपत्रातून कळाले असे होत असेल तर शिक्षकांकडून हे अपेक्षित नाही. मागील निवडणुकीतही वाटप झाले होते. पण, ते कोणी घातलं नव्हते. ही फसवेगिरी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here