Chhatrapati Sambhaji Maharaj : नगर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांची १४ मे राेजी जयंती आहे. जयंतीच्या दिवशी प्रोफेसर चौकात पुतळा बसवण्यासाठी शासन, प्रशासनाला अनेकदा निवेदने, विनंत्या, अर्ज करूनही दखल घेतली नाही. त्यामुळे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना (Maratha Youth Association), शिवप्रतिष्ठानतर्फे (Shiv Pratishthan) ११ मे पासून आमरण उपाेषण करण्याचा इशारा दिला आहे.
हे देखील वाचा : गरिबांचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट; पंतप्रधान माेदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबाेल
महापालिका प्रशासनाला मागणीचे निवेदन (Sambhaji Maharaj)
मागणीचे निवेदन नुकतेच महापालिका प्रशासनाला देण्यात आले. त्यावेळी छावा संघटनेचे महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा सांगळे, शिवप्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष बापू ठाणगे, दत्ताभाऊ वामन, दीपक गहिले, किरण वाघ, भैय्या पठाण, केशव बरकते, अभय पतंगे, शंकर आटोळे, विलास कराळे, साहेबराव पाचारणे, सुनील ठाकरे आदी उपस्थित हाेते.
नक्की वाचा: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ
पुढे निवेदनात म्हटले आहे की (Sambhaji Maharaj)
छावा संघटनेतर्फे प्राेफेसर चाैकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी जाेर धरला आहे. शासन, प्रशासनाकडून या प्रकरणी दुर्लक्ष हाेत असल्याचे संघटनेकडून बाेलले जात आहे. त्यामुळे संघटनेतर्फे ११ मेपासून उपाेषण करण्याचा पवित्रा घेतला आहे.