Chhatrapati Sambhaji Maharaj : कर्जतमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात

Chhatrapati Sambhaji Maharaj : कर्जतमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात

0

Chhatrapati Sambhaji Maharaj : कर्जत: धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा राज्याभिषेक (Rajyabhishek) सोहळा उत्सव कर्जतमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने (Maratha Society) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) चौकात संभाजी महाराज यांच्या आकर्षक फुलांनी सजविलेल्या पालखीतील पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठा जयघोष करण्यात आला.

नक्की वाचा : इस्रोचं स्पेडेक्स मिशन यशस्वी;अंतराळात डॉकिंग करणारा चौथा देश ठरला भारत

छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन

कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक फुलांनी सजविलेल्या पालखीतील सिंहासनावर आरूढ छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन कर्जत तालुका सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे यांच्यासह ज्येष्ठ नेते राजेंद्र फाळके, बाळासाहेब साळुंके, अंबादास पिसाळ, प्रवीण घुले, बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, तात्यासाहेब ढेरे, बाप्पाजी धांडे, सुनील शेलार, अशोक खेडकर, काकासाहेब धांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जय जिजाऊ-जय शिवराय, छत्रपत्री शहाजीराजे यांच्यासह धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा मोठा जयघोष करण्यात आला.

Chhatrapati Sambhaji Maharaj : कर्जतमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात
Chhatrapati Sambhaji Maharaj : कर्जतमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात

अवश्य वाचा : मोठी बातमी!अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला

यावेळी राजेंद्र फाळके म्हणाले की, (Chhatrapati Sambhaji Maharaj)

अठरा-पगड जातींना सोबत घेत स्वराज्य निर्माण करण्याचे काम छत्रपती शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांनी केले. समाजातील विकृत गोष्टीना पायबंद घालण्याचा संदेश छत्रपतींनी दिला. त्यांच्या विचारांनी तरुणांनी प्रभावित होत ते स्वराज्य घडवावे ,असा संदेश उपस्थितांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजेंद्र यादव यांनी केले तर आभार बाळासाहेब साळुंके यांनी मानले.