
Chhatrapati Sambhaji Maharaj : नगर : नगरवासीयांना २००७ पासून असलेली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) पूर्णाकृती पुतळ्याची प्रतीक्षा आता संपली आहे. सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकात उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज साेमवार (ता.१५) दुपारी ३ वा. होणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिली.
नक्की वाचा : राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद;महापालिका व जिल्हा परिषदेच्या तारखा जाहीर होणार?
कृती समिती व मनपाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी
सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौकात महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व चौथऱ्याचे काम पूर्णत्वास आले आहे. या पुतळ्याचे लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप, मनापाचे प्रशासक यशवंत डांगे यांच्यासह पुतळा कृती समितीच्या सदस्यांनी व मनपाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
अवश्य वाचा: लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच रेल्वे मार्गाचे निर्णय व्हावेत : विखे पाटील
आमदार जगताप म्हणाले, (Chhatrapati Sambhaji Maharaj)
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळ्यास माजी खासदार सुजय विखे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महापालिका आयुक्त यशवंत डांगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होणार आहे. नगर वासियांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

नगरमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी सर्वप्रथम दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांनी २००७ मध्ये महापालिकेच्या जनरल बोर्ड मध्ये ठराव केला होता. दुर्दैवाने २०२५ पर्यंत यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, या पुतळ्याबाबत महत्वाचे निर्णय घेत महापालिकेने यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक वर्षानुवर्षे धर्म रक्षणाचे विचार व प्रेरणा देत राहील. छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा १२ फुट उंच असून तो १५ फूट उंच चौथर्यावर बसवण्यात येणार आहे. ब्राँझ धातुने बनवलेल्या या पुतळ्याचे वजन ८०० किलोग्रॅम आहे. पुतळ्याच्या भोवती आकर्षक सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
यावेळी महापालिकेचे अभियंता परिमल निकम, शहर अभियंता मनोज पारखे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हध्यक्ष संपत बारस्कर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा समितीचे अजिंक्य बोरकर, वैभव वाघ, संतोष लांडे, सतीश बारस्कर, सचिन जगताप, गजानन भांडवलकर, किरण बारस्कर, बाळासाहेब निकम, जय दिघे, विजय सुंबे, राजेंद्र ससे, कुमार नवले, विश्वास शिंदे, आशिष काळे, अमोल गाडे, संदीप थोरात, विशाल मस्के, अशुतोष बांगर, भाजपाचे मुकुल गंधे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


